BAFTA 2021: 'द व्हाइट टायगर' साठी नॉमिनेशन झाल्याने मला आश्चर्याचा धक्का बसला होता

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 7 एप्रिल 2021

आदर्श गौरव ला ब्रिटिश अ‍ॅकॅडमी ऑफ फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन आर्ट्स 2021 अवॉर्ड्स मध्ये  'द व्हाइट टायगर' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून नॉमिनेशन प्राप्त झाले.

BAFTA 2021: भारतीय अभिनेता आदर्श गौरवने  (Adarsh Gourav)  'द व्हाइट टायगर' (The White Tiger) चित्रपटामध्ये अशी चमकदार कामगिरी बजावली की त्याला देश आणि जगात खूप वाहवा मिळाली. आदर्श गौरव ला ब्रिटिश अ‍ॅकॅडमी ऑफ फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन आर्ट्स 2021 अवॉर्ड्स मध्ये (BAFTA 2021) 'द व्हाइट टायगर' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून नॉमिनेशन प्राप्त झाले. 9 मार्च ला बाफटा पुरस्कारासाठी सर्व नॉमिनेशनची घोषणा करण्यात आली.

बाफटामध्ये मिळालेल्या नॉमिनेशनाबाबत अभिनेता आदर्श गौरवने एका मुलाखतीत आपली प्रतिक्रीया दिली आहे. "माझ्यासाठी हे अश्वसनीय आहे. जेव्हा मला माझ नांमांकन झाल्याची बातमी मिळाली तेव्हा मी जीममध्ये होतो. मी माझा फोन पाहिला आणि व्हाईट टायगरच्या व्हाट्सएप ग्रुपवर बरेच मेसेजेस आलेले मला दिसले. हे नॉमिनेशन माझ्यासाठी अत्यंत अनपेक्षित होतं,"

चित्रपटात साकारली दमदार भूमिका

'द व्हाईट टायगर' चित्रपटामध्ये प्रियंका चोपडा आणि राजकुमार राव सारखे कलाकार होते, परंतु आदर्शच्या भुमिकेने सर्वांची मन जिकली. या चित्रपटात आदर्शने इतकी दमदार भूमिका केली की त्याच्यासमोर सगळे कलाकार फिके पडले असं म्हणायला हरकत नाही. या चित्रपटामध्ये आदर्शने एका बलाराम नावाच्या हलवाई ची भूमिका साकारली होती, जो नंतर काहीतरी नौटंकी करून एका श्रीमंत व्यक्तीकडे ड्रायव्हर बनला असतो.

राजकुमार राव आणि प्रियांका चोप्रा याच्या घरी नोकर म्हणून काम करणारा बलराम त्यांची श्रीमंती बघून प्रभावित होतो. राजकुमार राव सारखं बलरामलाही एक मोठा उद्योजक बनवायचं असतं, परंतु एका अपघाताने त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते. आदर्शने या चित्रपटाट उत्कृष्ट भूमिका पार पाडली आहे. हा चित्रपट  नेटफ्लिक्सवर हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत प्रदर्शित झाला. 'द व्हाइट टायगर' या कादंबरीवर आधारीत हा चित्रपट रामिन यांनी दिग्दर्शित केला आहे.

ओटीटी प्रेमींसाठी चालू आठवडा ठरणार पर्वणी; बिग बुलसह या नव्या वेब्सिरीजची एंट्री 

शाहरुखची बालपणीची भूमिका साकारली होती

आदर्श गौरवविषयी बोलताना तो अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिसला आहे. 'माय नेम इज खान' चित्रपटात आदर्शने शाहरुख खानचे बालपणीचे पात्र साकारले होते. याशिवाय तो श्रीदेवीच्या मॉम चित्रपटातही दिसला होता. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली.

आदर्शला लहानपणापासूनच अभिनयाच्या जगात पाऊल ठेवायचे होते. आज आदर्शला मिळालेला पुरस्कारासाठी त्याने खूप परिश्रम घेतले आहेत. चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी त्याने टीव्ही आणि डिजिटल अॅडमध्येही काम केले आहे. व्हाईट टायगरच्या ऑडिशनच्या 5 महिन्यांपूर्वी तो पूर्णपणे बेरोजगार होता असं म्हणायाला हरकत  नाही. त्याला काही काम नव्हते. यानंतर त्याने या चित्रपटासाठी ऑडिशन दिले आणि सर्वांना दाखवून दिले की तो किती उत्तम कलाकार आहे. या चित्रपटाद्वारे आदर्श गौरवने आता हॉलीवूडमध्येही एन्ट्री घेतली आहे.

संबंधित बातम्या