Bafta Awards 2023: आय एम रुथ ने सिंगल ड्रामासाठी मारली बाजी...जाणुन घ्या विजेत्यांची नावं

BAFTA TV Awards 2023 मध्ये 'The Masked Singer' ला सर्वोत्कृष्ट मनोरंजन कार्यक्रम श्रेणीमध्ये पुरस्कार मिळाला आहे.
Bafta Awards 2023
Bafta Awards 2023Dainik Gomantak

Bafta Awards 2023: जगभरातल्या मनोरंजन विश्वातला विशेषत: टेलिव्हिजन इंडस्ट्रीसाठी मानाचा समजला जाणारा बाफ्टा अवॉर्ड काल मध्यरात्री पार पडला. लंडनमध्ये मध्यरात्री बाफ्टा टीव्ही अवॉर्ड्सची सुरुवात झाली होती. लंडनमधील रॉयल फेस्टिव्हल हॉलमध्ये एका शानदार समारंभात हे पुरस्कार प्रदान केले गेले. 

कॉमेडियन रॉब बेकेट आणि रोमेश रंगनाथन यांनी हा अवॉर्ड शो होस्ट केला. शोमध्ये सिंगल ड्रामामध्ये 'आय ऍम रुथ'ने बाजी मारली आहे. ही केट विन्सलेट अभिनीत फिमेल ड्रामा पोएट्री सिरीयल आहे. चॅनल 4 कार्यक्रमाने नेटफ्लिक्सच्या 'द हाऊस' आणि बीबीसी थ्रीच्या 'लाइफ अँड डॅश इन द वेअरहाऊस'लाही मागे टाकले आहे.

BAFTA TV Awards 2023 मध्ये 'The Masked Singer' ला सर्वोत्कृष्ट मनोरंजन कार्यक्रम श्रेणीमध्ये पुरस्कार मिळाला आहे. सॅटर्डे नाईट टेकअवे आणि स्ट्रिक्टली कम डान्सिंग सारख्या कार्यक्रमांना मागे टाकत 'द मास्कड सिंगर'ने आपले नाव कोरले आहे.

अमेरिकन टीव्ही प्रस्तुतकर्ता, रेडिओ पर्सनॅलिटी क्लॉडिया विंकलमन यांना मनोरंजन कार्यक्रमासाठी बाफ्टा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 'द ट्रेटर्स' या अमेरिकन रिअॅलिटी टीव्ही शोसाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.

Bafta Awards 2023
Raghav Chadha Parineeti Chopra Engagement: 'वे माही' गाणं वाजलं अन् राघव चढ्ढांनी परिणिताला केलं किस...Video Viral

अभिनेत्री अॅन मेरी डफ हिला सहाय्यक अभिनेत्रीचा बाफ्टा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेत्रीने एक सुंदर संदेशही दिला.

ब्रिटीश बालकलाकार लेनी रश याला 'आय एम बीइंग अनरेझनेबल' या कॉमेडी शोमधील कामासाठी सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनयासाठी बाफ्टा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 'आय एम बीइंग अनरेझनेबल' ही डेझी मे कूपर आणि सेलिन हिगली अभिनीत ब्रिटिश कॉमेडी-थ्रिलर मालिका आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com