‘पाताल लोक’वर बंदी आणा.... हिंदू जनजागृती समितीची मागणी

dainik gomantak
शनिवार, 30 मे 2020

एक मुसलमान महिला हिंदू महिलेला पाणी देते, तेव्हा ती हिंदू महिला पाणी पिण्यास नकार देते, असे चित्रण या वेब सिरीजमध्ये केल्याचे समितीचे म्हणणे आहे.

पणजी, 

अनेक समाजात तेढ निर्माण करणारी आणि हिंदु धर्माविषयी द्वेष पसरवणारी दृश्ये पाताल लोक वेब सिरीजमध्ये दाखवली आहेत. हे अत्यंत निषेधार्ह असून हिंदू जनजागृती समिती याचा निषेध करत ‘पाताल लोक’ या वेबसिरीजवर शासनाने तत्काळ बंदी आणावी, अशी मागणीही समितीने केली आहे.
अनुष्का शर्माच्या प्रोडक्शनद्वारे निर्मित ‘पाताल लोक’ ही वेबसिरीज पूर्णतः हिंदूविरोधी भूमिकेतून बनवण्यात आलेली असून, त्यात अत्यंत आक्षेपार्ह दृश्ये दाखवण्यात आली आहेत. यामध्ये एका कुत्रीचे नाव ‘सावित्री’ असे ठेवण्यात आले आहे. मंदिरात पुजारी मांस शिजवून खातांना दाखवले आहेत. भगवे वस्त्र नेसलेले लोक ‘जय श्रीराम’ म्हणत गुंडगिरी करताना दाखवले आहेत. साधू-संतांना अर्वाच्च शिवीगाळ करताना दाखवले आहे. एका प्रसंगात एका व्यक्तीला जानवे घालून बलात्कार करताना दाखवले आहे. एक मुसलमान महिला हिंदू महिलेला पाणी देते, तेव्हा ती हिंदू महिला पाणी पिण्यास नकार देते, असे चित्रण या वेब सिरीजमध्ये केल्याचे समितीचे म्हणणे आहे.

 

संबंधित बातम्या