कंगना विरोधात एफआयआर दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

याच्या विरोधातच दोन मुस्लिम व्यक्तींनी बांद्रा कोर्टात याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये म्हटलं होतं की, 'कंगना रनौत तिच्या ट्विट्सच्या माध्यमातून दोन समुदायांमध्ये द्वेष निर्माण करण्याला प्रोत्साहन देत आहे. यामुळे केवळ धार्मिक भावनांनाच ठेच पोहोचत नाहीये तर इंडस्ट्रीतील कित्येक लोक दुखावले गेले आहेत.

मुंबई- आज सोशल मिडियावरील सर्वात चर्चिले जाणारे नाव म्हणजे कंगना रनौत. सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर सतत हिंदी चित्रपट सृष्टीतील घराणेशाही, फेवरेटिज्म आणि ड्रग्स प्रकरणावर तिने परखड मते व्यक्त केली. एवढेच नव्हे तर या प्रकरणी नवनवीन खुलासे करत ही प्रकरणे लावून धरली. आता कंगनाच्या विरोधात मुंबईतील बांद्रा कोर्टाने एका प्रकरणात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. बांद्रा कोर्टाने हे आदेश दोन व्यक्तींनी दाखल केलेल्या याचिकेवर दिले आहेत.

कंगनाविरोधात याचिका दाखल करणा-यांनी म्हटलंय की 'ती बॉलीवूडमध्ये हिंदू-मुस्लिम समुदायमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मिडियाच्या माध्यमापासून ते टीव्हीवर सगळीकडे बॉलीवूडच्या विरोधात बोलत आहे. ती सतत बॉलीवूड विरोधात विष ओकतेय.'

याच्या विरोधातच दोन मुस्लिम व्यक्तींनी बांद्रा कोर्टात याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये म्हटलं होतं की, 'कंगना रनौत तिच्या ट्विट्सच्या माध्यमातून दोन समुदायांमध्ये द्वेष निर्माण करण्याला प्रोत्साहन देत आहे. यामुळे केवळ धार्मिक भावनांनाच ठेच पोहोचत नाहीये तर इंडस्ट्रीतील कित्येक लोक दुखावले गेले आहेत. त्यामुळे कंगनावर जातीयवादाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप लावला गेला होता. 
या प्रकरणी बांद्रा पोलिस स्टेशनने कंगनाच्या विरुद्ध हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी प्रकरणाचा तपास व्हावा यासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. कोर्टाने कंगनाविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्यांनी कोर्टात कंगनाचे ट्विट्स सादर केले.

सीआरपीसीच्या कलम १५६(३) नुसार कंगनाविरोधात एफआयआर दाखल होऊ शकते. एफआयआर दाखल झाल्यानंतर कंगनाची चौकशी होऊ शकते आणि जर तिच्या विरोधात ठोस पुरावे मिळाले तर तिला अटक देखील होऊ शकते. 

संबंधित बातम्या