Twinkle Khanna : अभिनेत्री बनण्याआधी ती मासे आणि झिंगे विकायची, लोक म्हणायचे तू...

अभिनेत्री ट्विंकल खन्ना या क्षेत्रात येण्यापूर्वी मासे आणि झिंगे विकायची
Twinkle Khanna
Twinkle KhannaDainik Gomantak

बॉलिवूडच्या खिलाडी कुमारची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्नाने 90 च्या दशकामध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडण्याचा प्रयत्न केला पण त्यात ती पूर्णत: यशस्वी झाली नाही. एकेकाळी ती डिलिव्हरी गर्ल होती. 

ट्विंकल खन्नाने अलीकडेच तिच्या पहिल्या कामाबद्दल सांगितले. ट्विंकल खन्ना म्हणाली की ती एकेकाळी मासे आणि कोळंबी विकायची. तिला पाहून लोक विचारायचे, तू कोळी आहेस का? अक्षय कुमारची पत्नी ट्विंकलने तिच्या TweakIndia शोमध्ये याचा खुलासा केला आहे. यामध्ये अभिनेते जॉनी लीव्हरही होते. या शोमध्ये अक्षय कुमारही दिसला होता.

ट्विंकल खन्ना जॉनी लीव्हरला विचारते की कॉमेडियन बनण्याआधी त्याने आपल्या आयुष्यातील सर्वात विचित्र काम कोणते केले. उत्तरात जॉनी लीव्हरने सांगितले की तो रस्त्यावर पेन विकायचा. चांगली विक्री व्हावी म्हणुन तो कलाकारांची नक्कल करून पेन विकायचा.

दरम्यान, ट्विंकल खन्नानेही तिच्या पहिल्या कामाबद्दल सांगितले. ती म्हणाली, 'मला आठवतं माझं पहिलं काम मासे आणि कोळंबी पोचवण्याचं होतं. माझ्या आजीच्या बहिणीची फिश कंपनी होती. त्याचे नाव मच्छीवाला. मी ही गोष्ट कुणाला सांगायची तेव्हा ते म्हणायचे की तू मच्छीमार आहेस?

Twinkle Khanna
Rohit Shetty's Upcoming Web Series : रोहित शेट्टीची ही आगामी वेब सिरीज येतेय दिवाळीत...

फिल्मी करिअरबद्दल बोलायचे झाले तर ट्विंकल खन्नाने 1995 मध्ये 'बरसात' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती 'जब प्यार किसी से होता है', 'मेला', 'जोरू का गुलाम' आणि 'बादशाह' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली. त्यानंतर ट्विंकल खन्नाने 2001 मध्ये अभिनयाला अलविदा केला. यानंतर 2015 पासून ती लेखनाकडे वळली आली आणि तिने काही पुस्तकंही लिहिली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com