"जिथे खुप्ते तिथे गुप्ते", जातीव्यवस्थेवर भाष्य करणारा अवधूर गुप्तेंचा नवा रॅप

दैनिक गोमन्तक
शनिवार, 26 डिसेंबर 2020

अवधूतच्या या नव्या रॅपचं नाव ‘जात’ असं आहे. या गाण्यातील रॅपमधून त्याने जातीय व्यवस्थेवर आपले विचार व्यक्त केले आहे.

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टी आणि संगीतसृष्टीत नावजलेल नाव म्हणजेच अवधूत गुप्ते. गायक, संगीत दिग्दर्शक, परीक्षक अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून अवधूत गुप्ते नेहमीच प्रेक्षकांना बघायला मिळतात. प्रेक्षकांसाठी नेहमीच नवीन अंदाजात काही तरी हटके करण्याचा प्रयत्न अवधूत करत असतो. कोल्हापूरी रॅप त्याचा प्रसिध्द आहेच तेव्हा आता आणखी एक विशेष रॅप साँग घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

अवधूतच्या या नव्या रॅपचं नाव ‘जात’ असं आहे. या गाण्यातील रॅपमधून त्याने जातीय व्यवस्थेवर आपले विचार व्यक्त केले आहे. माणुसकी हीच खरी जात आहे असा संदेश या गाण्यातून त्याने प्रेक्षकांना दिला आहे.  आणि जात हा संवेदनशील विषय या गाण्यातून सादर करण्याचा प्रयत्न अवधूतने केला आहे.

या गाण्याला सोशल मिडियावर नेटकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या गाण्याचे गीतकार समीर सावंत आहे. तर, या गीताला विक्रम बाम यांनी संगीतबध्द केल  आहे. अवधूतची ‘ऐका दाजीबा’, ‘मधुबाला’, कोल्हापूरी रॅप अशी अनेक गाणी गाजली आहेत. ‘झेंडा’, ‘कान्हा’, ‘बॉइज’, ‘रेगे’, ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’, ‘मोरया’ असे त्याचे अनेक चित्रपट आणि त्यातील गीतं सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहे आणि विशेष गाजलेली आहेत.

“मी बरेच वेगवेगळे प्रकार हाताळले पण मी रॅप कधी केला नव्हता. हा प्रकार मला करायचा होता. म्हणून मी हे गाणं करायचं ठरवलं. त्यातही हे गाणं करताना त्याचं फक्त रंजन न करता काहीतरी समाजाला सांगावं असंही वाटून गेलं. म्हणून जात हा विषय घेतला. मला यात कोणत्याही जातीचा अवमान करायचा नाही. कारण मला सगळ्याच जातीचा आदर आहे. पण या सगळ्या पलिकडे मला माणुसकीची जात महत्वाची वाटते. ती आपण सगळ्यांनी जपली पाहिजे” असं अवधूत आपल्या नव्या गाण्याबद्दल बोलताना म्हणाला.

अवधूत गुप्ते हा उत्तम असा कलाकार मराठी सिनेसृष्टीला लाभला आहे. तो एक उत्तम संगीतकार तर आहेच. शिवाय तो उत्तम गायकही आहे. आणि यासोबतच अवधूत गुप्ते निर्माता, दिग्दर्शकही आहे. त्याने आणलेला जय जय महाराष्ट्र माझा.. हे गाणं लोकांना खूप भावलं होतं.

अनेक नव्या गोष्टी आणि नेहमीच हट के प्रयोग सातत्याने करत असतो. कोणत्याही कलाकाराची धडपडच त्याच्यात असलेल्या कलाकाराला जिवंत ठेवत असते.

मनातल्या भावनांना वाट मोकळी करून देण्याचं उत्तम माध्यम म्हणजे गाण अवधूतने ही तेच केल त्यच्या मनातील भावनेला त्याने वाट मोकळी करून देली. हे गाणं आता लवकरच प्रेक्षकांपुढे येणार आहे. त्यानंतर त्याला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहाणं आश्चर्यकारक ठरणार आहे. अवधूत गुप्ते याने एकसेबढकर एक गाणी मराठी संगीतविश्वाला दिली आहेत. आता अवधूत आणखी एक तडफदार अस काही लोकांसमोर घेऊन आला आहे. लोकांना ते नक्की आवडेल अशी त्याची खात्री आहे.

आणखी वाचा:

‘टर्री’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ललित प्रभाकर दिसणार डॅशींग लूकमध्ये -

 

 

 

 

संबंधित बातम्या