'बेल बॉटम'च्या कास्टिंग डायरेक्टरवर बलात्काराचा आरोप; सिनेमावाले म्हणतात आमचा काहीही संबंध नाही

गोमंतक ऑनलाईन टीम
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

पुढील वर्षात सिनेमा येणार असून त्याआधीच एका वादात हा सिनेमा सापडला आहे. या सिनेमाचा कास्टींग डायरेक्टर आयुष तिवारीवर एका टेलीव्हीजन अभिनेत्रीने बलात्काराचे आरोप केले आहेत.

'लक्ष्मी'नंतर आता बेल बॉटम हा अक्षय कुमारचा नवीन सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पुढील वर्षात सिनेमा येणार असून त्याआधीच एका वादात हा सिनेमा सापडला आहे. या सिनेमाचा कास्टींग डायरेक्टर आयुष तिवारीवर एका टेलीव्हीजन अभिनेत्रीने बलात्काराचे आरोप केले आहेत. त्याने लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्ष बलात्कार केला. त्याच्यापासून दूर गेल्यावरही फोनवर पॉर्न व्हिडिओ पाठवून छळ केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी मुंबईच्या वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   
 
दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर 'बेल बॉटम'च्या टीमने भूवया उंचावल्या आहेत. आयुष तिवारी नामक कोणतीही व्यक्ती सिनेमाच्या कास्टिंगशी संबंधित नाही. या सिनेमाचे कास्टिंग डायरेक्टर वैभव निशान्त हे असून त्यांनीच या प्रकरणी ट्विटरवर लांब पोस्ट लिहिली आहे. ते म्हणतात, 'हे बघून दु:ख होते की हा सिनेमा आणि त्याच्या संबंधित व्यक्तिंबद्दल असे बोलले जाते. 'बेल बॉटम'चा कास्टिंग डायरेक्टर मी असून आयुष तिवारी माझ्या कंपनीत एक फ्री लांन्स इंटर्न म्हणून कार्यरत होता. त्याचा सिनेमा आणि त्याच्या कास्टिंगशी काहीही संबंध नसून त्याने या सिनेमावर कोणत्याही पद्धतीचे काम केलेले नाही.' 

काही मीडिया हाऊस क्लिकबेटसाठी कोणत्याही थरापर्यंत जातात ही बाब अत्यंत निराश करणारी आहे. कोणतेही तथ्य नसणाऱ्या गोष्टी माध्यमे छापत आहेत. मात्र, पोलिस या घटनेचा निष्पक्षपणे तपास करतील आणि न्याय करतील, अशी आशाही या सिनेमाच्या कास्टिंग डायरेक्टरने व्यक्त केली. 

पोलिसांनी याप्रकरणी 26 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला होता. पुढील तपासासाठी आयुष याला लवकरच पोलिस ठाण्यात बोलवण्यात येईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

संबंधित बातम्या