Bilawal Bhutto Zardari: 'बेशरम रंग'वर तरुणीसोबत थिरकले बिलावल भुट्टो? व्हायरल व्हिडीओची जाणून घ्या सत्यता

Shah Rukh Khan: शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यावरुन सुरु असलेला वाद अद्याप शमलेला नाही. 'बेशरम रंग' गाण्यावरुन अजूनही निदर्शने होताना दिसत आहेत.
Bilawal Bhutto Zardari
Bilawal Bhutto ZardariDainik Gomantak

Bilawal Bhutto Zardari: शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यावरुन सुरु असलेला वाद अद्याप शमलेला नाही. 'बेशरम रंग' गाण्यावरुन अजूनही निदर्शने होताना दिसत आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियावर लोक या गाण्यावर रिल्सही बनवत आहेत.

अलीकडेच, ट्विटरवर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो 'बेशरम रंग' या गाण्यावर डान्स करत असल्याचा दावा करण्यात आला होता. या व्हिडीओची सत्यता आता समोर आली आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात 'बेशरम रंग' या गाण्यावर नाचतानाचा दोन लोकांचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला. त्यामध्ये दावा करण्यात आला आहे की, या दोघांपैकी एकजण पाकिस्तानचे (Pakistan) परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो आहेत.

Bilawal Bhutto Zardari
Shweta Tiwari Viral Video: 'बेशरम रंग'वर श्वेता तिवारीचा भन्नाट डान्स, पाहा व्हिडिओ

मात्र, 'फॅक्ट चेक'मध्ये 'क्लिप'मध्ये दिसणारी व्यक्ती प्रत्यक्षात कराची येथील मीडिया स्टुडंट असल्याचे आढळून आले. बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या आगामी 'पठाण' चित्रपटाच्या गाण्याचा ट्रेलर लॉन्च झाल्यापासून सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. त्याच्या गाण्याचे बोल आणि वेशभूषा यामुळे वाद निर्माण झाला आहे. हे गाणे इंस्टाग्राम यूजर्समध्ये प्रचंड हिट झाले आहे. इंस्टाग्राम यूजर्स या रील्सवर "डान्स स्टेप्स" कॉपी करताना दिसतात.

Bilawal Bhutto Zardari
Avneet Kaur Video : अवनीत कौरचा 'बेशरम रंग' पाहून चाहत्यांच्या भुवया उंच,काहींनी दिले धडे

ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये असे लिहिले आहे की, “बिलावल भुट्टो सारख्या नेत्यांच्या सुरक्षित हातात पाकिस्तान आहे. त्यांना काश्मीर हवा आहे. 12 जानेवारी रोजी पोस्ट करण्यात आलेला व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओसारखाच असल्याचे दिसत आहे. ट्विट केलेला व्हिडिओ वेगळ्या कोनातून शूट करण्यात आला आहे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com