गांजासेवनप्रकरणी भारतीसिंह व हर्षला न्यायालयीन कोठडी; जामीन अर्जावर आज सुनावणी

Bharati Singh and Harsh in judicial custody hearing on bail application today
Bharati Singh and Harsh in judicial custody hearing on bail application today

मुंबई :  गांजा सेवनप्रकरणी अटक केलेली विनोदी कलाकार भारती सिंह व तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना किल्ला (एक्‍सप्लेनेट) न्यायालयाने चार डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोघांनीही जामीनासाठी अर्ज केला असून, त्याची आज सुनावणी होणार आहे.

केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) विनोदी कलाकार भारती सिंहच्या घरावर शनिवारी (ता. २१) छापा टाकला. त्या वेळी तिच्या घरात अमली पदार्थ सापडल्याने एनसीबीने तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत भारती आणि तिचा पती हर्षने अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने तिला एनपीडीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. या वेळी भारतीची चार तास, तर हर्षची तब्बल १५ तास एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. 

अधिक वाचा :

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com