बीग बी अमिताभ बच्चन यांनी केली रिटायरमेंटची घोषणा!

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 14 जानेवारी 2021

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय शो असणाऱ्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन  केबीसीमधून रिटायरमेंट घेणार का? याची चर्चा रंगली आहे.

मुंबई :छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय शो असणाऱ्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन  केबीसीमधून रिटायरमेंट घेणार का? याची चर्चा रंगली आहे.अमिताभ बच्चन आपल्या मनातील गोष्टी ब्लॉगच्या माध्यमातून सोशल मिडीयावर मांडताना सतत दिसतात.

नुकताच त्यांनी लिहलेल्या ब्लॉगमध्ये रिटायरमेंटची घोषणा केली आहे.त्यांनी ब्लॉगमधून,'मी आता थकलो आहे, सर्वांची माफी मागतो.केबीसीचे शूटिंग फार खूपचं लाबंल असल्याने उद्या पुन्हा करु शकेन.काम हे काम असतं ते पूर्ण मन लावून करायला पाहिजे.मी सेटवर असताना माझी सर्वांनी काळजी घेतली.

गेले अनेक दिवस आपण सर्वांनी मिळून काम केलं.माझ्या ते सदैव लक्षात राहणार आहे.मात्र चाहत्यांनी बच्चन यांना सूत्रसंचालन करताना पाहण्यासाठीची इच्छा व्यक्त आहे.पुढल्या सीजनचे अमिताभ सूत्रसंचालन करतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या