'वाचू शकत नाही, लिहू शकत नाही'; बिग बीं नी डोळ्याच्या शस्त्रक्रियाबद्दल व्यक्त केल्या भावना

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 1 मार्च 2021

या उतार वयात डोळ्यांबाबत असणारी सर्जरी एकदम नाजूक आणि सटीक असते, आणि त्यासंबंधी काळजी घेणे आवश्यक असते.

मुंबई : बीग बीं नी आपल्या ब्लागच्या माध्यमातून सर्जरीबद्दलच्या डिटेल्स दिल्या आहेत. आणि या दरम्यान आलेला अनुभवही कथन केला आहे. अमिताभ बच्चन यांनी ब्लागमधून खुलासा केला की, डोळ्यांवर सर्जरी झाली आहे. मात्र सर्जरी कशापध्दतीने झाली याबद्दल त्यांनी सांगितलं नाही. ''माझ्याबद्दल असणारी तुमची चिंता आणि शुभेच्छा या बद्दल धन्यवाद.. या उतार वयात डोळ्यांबाबत असणारी सर्जरी एकदम नाजूक आणि सटीक असते, आणि त्यासंबंधी काळजी घेणे आवश्यक असते. जे ही आवश्यक आहे ते सगळं करण्यात येत आहे. आणि मला विश्वास आहे की, सगळं काही ठीक होईल. आता मला गैरी सोबर्स सारखं वाटत आहे. वेस्ट इंडीजचे महान क्रिकेटर यांची आठवण येत आहे. त्यांच्यांशी निगडीत असणारी गोष्ट ऐकली होती. मला माहीत नाही, की ती किती खरी आहे का? काल्पनिक आहे.’’

Golden Globes 2021:चॅडविक बॉसमनला मरणोत्तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

‘’एक मजबूत प्रतिस्पर्धीच्या विरुध्द वेस्ट इंडीजची टीम खूप चांगलं प्रदर्शन करु शकत नव्हती, आणि ती हरणार अशा स्थितीत येऊन पोहचली होती. महान क्रिकेटर गैरी सोबर्स ड्रेसिंग रुममध्ये बसले होते. ज्यावेळेस त्यांच्यावर फलंदाजी करण्याची वेळ आली त्यावेळी त्यांनी वेगवान शतक ठोकलं होतं. त्यांनी त्यानंतर सांगितंल होत की, ज्यावेळेस मी मैदानावर खेळत होतो त्यावेळी मला तीन चेंडू दिसत होते आणि मी त्यातील मधला चेंडू मारत होतो.’’

अमिताब बच्चन यांनी पुढे सांगितले की, ''माझी ही अवस्था काही त्याप्रकारची आहे. मला आता शब्दांसाठी 3-3 अक्षरं दिसत आहेत आणि मी त्यातील मधल्य़ा अक्षरावर क्लिक करत आहे. सगळ्यांना माझं प्रेम...प्रगती ही सवकाश सुरु आहे....मात्र आता दूसराही डोळा सुस्थितीत आहे. मला आशा आहे की, पुढच्या चित्रपटाचे शूटींग सुरु होण्यापूर्वी सगळं काही ठीक होईल. दिग्दर्शक विकास बहल यांचा नवा चित्रपट ’गुडबाय’ आहे. '' 

संबंधित बातम्या