ईदच्या मुहूर्तावर भाईजानच्या चाहत्यांना मोठं गिफ्ट

दैनिक गोमंतक
बुधवार, 21 एप्रिल 2021

देशभरात कोरोनाची भीषण परिस्थिती असूनही सलमान खानने एक मोठा निर्णय घेतला आहे.

देशभरात कोरोनाची भीषण परिस्थिती असूनही सलमान खानने एक मोठा निर्णय घेतला आहे. बहुतेक राज्यात सिनेमागृह अर्धवट उघडे आहेत. असे असूनही, 'राधेः योर मोस्ट वांटेड भाई' या सिनेमाच्या रिलीजपासून मागे हटणार नाही अशी घोषणा सलमान खानने बुधवारी केली. सलमान चित्रपटाची ईदी देण्याची प्रथा मोडणार नाही. हा चित्रपट ईदच्या दिवशी 13 मे रोजी  चित्रपटगृहात प्रदर्षित होईल. आणि त्याच तारखेला हा चित्रपट ‘पे-पर-व्ह्यू’ प्रणालीअंतर्गत झीप्लेक्सवरही प्रदर्शित होणार आहे. जसे अनन्या पांडे आणि ईशान खट्टर यांचा 'खाली पाली' चित्रपट झीप्लेक्सवर आला होता. त्याअंतर्गत प्रेक्षकांना निश्चित रक्कम देऊन हा चित्रपट पाहायला मिळाला होता. हाच नियम 'राधे' या चित्रपटाला लागू होईल. त्याचबरोबर या चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी (22 एप्रिल) रिलीज होईल. (A big gift to the fans of Bhaijaan on the occasion of Eid)

ओ राशी, पावरी नंतर यशराज मुखातेचे नवीन रॅप होतंय तुफान व्हायरल; पहा video

कोरोना साथीने आपल्या सर्वांना नाविन्यपूर्ण होण्याची संधी दिली आहे. आम्ही हा चित्रपट झीप्लेक्सवर प्रदर्शित करणार आहोत. आम्ही ज्या देशात चित्रपटगृहे उघडी आहेत अशा  40 देशात चित्रपट प्रदर्शित करणार आहोत असे झी स्टुडिओचे सीईओ शरद पटेल म्हणाले.  जर आपण हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित नाही केला तर तो सलमानच्या चाहत्यांसोबत धोका होईल. आम्हालाही सर्वांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यायची आहे.त्यामुळे आम्ही हा चित्रपट झीप्लेक्सवरही प्रदर्शित करत आहोत. जेणेकरुन घरातले लोकही त्याचा आनंद लुटू शकतील असेही शरद पटेल म्हणाले. 

सलमान खानचे प्रवक्ते म्हणाले, "सद्य परिस्थिती लक्षात घेऊन सर्व भागधारक एकत्र आले. आम्ही चित्रपट उद्योग चालू ठेवण्यासाठी मध्यम मार्ग स्वीकारला. आम्हाला चित्रपट ऑपरेटर आणि मालकांच्या हक्कांची काळजी देखील घ्यायची होती. आम्हाही सेफ्टी मेजर्सचे पालन करणार आहोत. अशा परिस्थितीत चित्रपटगृहामध्येही आणि  घरीही चित्रपट पाहण्याचा पर्याय देण्यात आला आहे."

संबंधित बातम्या