Bill Gates In India: बिल गेट्स यांचा तो दौरा स्मृती इराणी, खिचडी आणि नेटिझन्सच्या अतरंगी कमेंट ...

उद्योगपती बिल गेट्स यांचा भारत दौरा सध्या चर्चेत आहे.
Bill Gates 
Smriti Irani
Bill Gates Smriti Irani Dainik Gomantak

Bill Gates In India: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सध्या एका पोस्टमुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. स्मृती इराणी यांनी बिल गेट्ससोबतचा एक फोटो शेअर केला असून इंस्टाग्रामवर या फोटोला मजेशीर कॅप्शन दिले आहे.

फोटोमध्ये बिल गेट्स दिसत स्मृती इराणी यांच्यासोबत दिसत आहेत. या फोटोत स्मृती इराणी स्वयंपाक करताना दिसत आहे. 

नुकत्याच महिला आणि बालविकास मंत्रालयाने आयोजित केलेल्या 'गोध भराई' कार्यक्रमात त्यांनी बाजरीची खिचडी बनवली होती

स्मृती इराणी एके काळी भारतीय टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय 'बहू (सून)' होती. ती एकता कपूरच्या क्यूंकी सास भी कभी बहू थी या शोमध्ये झळकली होती. 

चाहत्यांनी स्मृती इराणींच्या पोस्टच्या कमेंट सेक्शनचा पूर आला. त्यापैकी एकाने लिहिले, "बहुरिया मिस इंडिया फायनलिस्ट आहे. बहुरिया ही टीव्हीवरील सर्वात महान बहू आहे.

बहुरिया ही पप्पूची सर्वात मोठी भीती आहे. तुम क्या जानो गेट्स बाबू?" दुसर्‍याने लिहिले, "बिल गेट्स विचार करत आहेत " भारतीयाशी लग्न करायला हवं होतं." एका यूजरने कमेंट केली आहे शिजवलं काय आहे? आणि लिहलं काय आहे? तुम्ही जीरा भात तयार केला आहे का)"

बिल गेट्सच्या नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यात त्यांनी चांगलाच पाहुणचार घेतला आहे. कारण स्वत: केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांनी बिल गेट्स या्ंच्यासाठी खिचडी बनवली आहे. स्मृती इराणी त्यांना खिचडीत फोडणी कशी मारायची हे 'शिकवताना दिसतायत.

महिला आणि बाल विकास मंत्रालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमांसह त्यांनी काही कार्यक्रमांना हजेरी लावली होती. 

त्याबद्दल बोलताना त्यांनी माध्यमांना सांगितले की, "महिला आणि बाल विकास मंत्रालयाने आयोजित केलेल्या दोन महिलांसाठी 'गोध भराई' समारंभात - बाजरीची खिचडी, एक प्रकारची लापशी देखील चाखायला मिळाली. ."

Bill Gates 
Smriti Irani
Satish Kaushik Last Movie : सतीश कौशिक कंगना रणौतच्या या चित्रपटात शेवटचे दिसणार ऐतिहासिक भूमीकेत

बिल गेट्स यांनीही त्यांच्या भेटीचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आणि मंगळवारी लिहिले, "मी नुकताच माझ्या भारत भेटीवरून परतलो, आणि मी पुन्हा परत जाण्याची वाट पाहू शकत नाही. मला भारताला भेट देणे आवडते कारण प्रत्येक सहल ही शिकण्याची एक अविश्वसनीय संधी असते.

माझ्या गेल्या आठवड्यात मुंबई, दिल्ली आणि बंगलोरच्या प्रवासादरम्यान, मला काही आश्चर्यकारक लोक भेटले ज्यांनी मला शिकवले की ते जगाच्या आरोग्य, हवामान आणि विकास आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी नाविन्य, विज्ञान आणि सहकार्याची शक्ती कशी वापरत आहेत."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com