Ashish Vidyarthi Birthday Special: 182 चित्रपटांमध्ये साकारली खलनायकाची भूमिका

Ashish Vidyarthi Birthday Special: 182 चित्रपटांमध्ये साकारली खलनायकाची भूमिका
Ashish Vidyarthi

Ashish Vidyarthi Birthday Special: बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेता आशिष विद्यार्थी गेल्या तीन दशकांपासून बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याची भूमिका पार पाडतांना दिसततात. आज बॉलिवूडचे प्रसिद्ध विलन आशिष विद्यार्थी(Ashish Vidyarthi ) यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 19 जून 1962 रोजी दिल्ली येथे झाला होता. अभिनेत्याच्या वडिलांचे नाव गोविंद विद्यार्थी होते. आशिष यांचा सुरुवातीपासूनच अभिनय क्षेत्राशी संबध होता. ज्यामुळे त्याना लहानपणापासूनच चित्रपटांमध्ये जाण्याची संधी मिळाली. या अभिनेत्याने १९९० मध्ये दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये आपले शिक्षण पूर्ण केले आणि दिल्लीत वास्तव्य करून अनेक नाटकं केली. त्यानंतर ते 1992 मध्ये कामाच्या शोधात मुंबईत आले.(Birthday Special Ashish Vidyarthi played the role of a villain in 182 films)

येथून सुरू झालेला आशीष विद्यार्थी यांचा प्रवास पुन्हा कधी थांबला नाही. या अभिनेत्याने सर्वोत्कृष्ट चित्रपटात काम केले आहे ज्यात नाजायज, जीत, भाई, दौड, जिद्दी, मेजर साब, सोल्जर, हसीना मान जायेगी अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. पण या अभिनेत्याचे असे काही चित्रपट आहेत ज्यांना प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले होते. त्यापैकी एक म्हणजे ‘वास्तव’ चित्रपटातील त्यांची विठ्ठल कनियाची भूमिका कोणालाही विसरता येणार नाही. त्या अभिनेत्याचा त्या चित्रपटात मृत्यू झाला असला तरी संजय दत्तला साथ दिल्याबद्दल त्यांचे नेहमीच स्मरण केले जाते. तुम्हाला माहिती आहे काय, आतापर्यंत 182 वेळा आशिष विद्यार्थी यांचे चित्रपटात निधन झाले आहे. पण सर्व जण त्याच्या अभिनयाचे कौतूक करतात. त्याचबरोबर, त्याच्या उत्कृष्ट अभिनयाची झलक 'बिच्छू' चित्रपटात देखील दिसली.  या चित्रपटात अभिनेताने देवराज खत्री या खलनायकाची भूमिका केली होती.  प्रेक्षकांना त्यांची ही भूमिका खूप आवडली होती. या चित्रपटात बॉबी देओल आणि राणी मुखर्जी कलाकार मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट सन 2000 मध्ये रिलीज झाला होता. अभिनेता आशिष नुकतेच त्यांच्या ‘सनफ्लाव्हर’ चित्रपटात दिसले.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ashish Vidyarthi Avid Miner (@ashishvidyarthi1)

आशिष विद्यार्थी यांनी 11 वेगवेगळ्या भाषांमधील 230 उत्कृष्ट चित्रपटांत काम केले आहे. ते एका मल्याळी कुटुंबातून आले आहेत. ज्यामुळे ते दक्षिणेकडील चित्रपटांमध्येही चांगलाच धमाकेदार अभिनय केला आहे. आशिषच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलयचे झाले तर, त्यांनी अभिनेत्री राजोशी बरुआशी लग्न केले आहे. राजोशी एक उत्तम अभिनेत्री आहे. तीने अनेक छोट्या मोठ्या मालिकांमध्ये काम केले आहे. त्याबरोबर तिने बर्‍याच चित्रपटांमध्ये काम देखील केले आहे. आशिषने 24, ट्रक धनीधिन सारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. आजकाल कलाकार सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव असतात. आशिष अभिनयाशिवाय लोकांना जीवनाचे तत्वज्ञान समजावून सांगण्याचे काम करतात. आशिष दररोज त्यांचे नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात आणि लोकांना आपल्या मानातली गोष्ट शेअर करतात.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ashish Vidyarthi Avid Miner (@ashishvidyarthi1)

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com