Birthday Special: अय्यो! मुत्तू स्वामींच्या पाच पात्रांनी जिंकली प्रेक्षकांची मने

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 13 एप्रिल 2021

अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारलेले आणि विनोदी कलाकार म्हणून काम करणारे सतीश कौशिक हे बॉलिवूडचे एक दमदार अभिनेत्यांपैकी एक आहे.

बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा आज वाढदिवस आहे. ते 13 एप्रिल रोजी म्हणजेच आज 65 वर्षाचे झाले. अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारलेले आणि विनोदी कलाकार म्हणून काम करणारे सतीश कौशिक हे बॉलिवूडच्या एक दमदार अभिनेत्यांपैकी एक आहे. पात्र गंभीर असो किंवा कॉमेडी प्रत्येक भूमिकेत सतीश कौशिक आपल्या अभिनयाची छाप सोडतात. 1983 साली ‘मौसम’ या चित्रपटाने त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी एकापेक्षा चित्रपटांमध्ये व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्याच्या दमदार भूमिकांची यादी काढायला गेलं तर ती खूप लांब असणार आहे, परंतु त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रेक्षकांना सर्वाधिक आवडलेल्या पाच कॉमेडी भुमिकेची आठवण करूयो.

साजन चले ससुराल

'साजन चले ससुराल' चित्रपटात सतीश कौशिक यांनी मुत्तू स्वामीची भूमिका साकारली होती. सतीश कौशिक जेव्हा या चित्रपटात दिसले तेव्हा लोकं हसून हसून जमिनिवर लोळत होते. लोकांची हसून हालत खराब व्हायची. दक्षिण भारतीय उच्चारणातील त्यांची संवाद शैली प्रेक्षकांना खूप आवडली. 1996 साली रिलीज झालेल्या साजन चले ससुराल या चित्रपटत सतीश कौशिक गोविंदाच्या मित्राच्या भूमिकेत दिसले.

मिस्टर अॅंड मिसेस खिलाडी

1997 च्या मिस्टर अॅंड मिसेस खिलाडी या चित्रपटात सतीश कौशिक यांनी अक्षय कुमारच्या मामाची भूमिका केली होती. या चित्रपटात ते अक्षयला सांगतात की त्याच्या कुंडलीत राज योग आहे आणि त्याला श्रीमंत घराण्यातील मुलगी मिळेल .त्याचबरोबर तो नेहमी अक्षयला नवीन युक्त्या सुचवत असतो, ज्यामुळे परिस्थिती बिघडते आणि त्याचा मोठा विनोद होतो या. चित्रपटातील त्यांचे हे मामाचे पात्र प्रेक्षकांनी चांगलेच पसंत केले.

हसीना मान जायेगी

डेव्हिड धवनच्या या विनोदी चित्रपटात सतीश कौशिकने यांनी कादर खानच्या पीए ची सहाय्यक भूमिका साकारली होती. संजय दत्त आणि गोविंदाच्या या विनोदी चित्रपटात सतीश कौशिक कुंज बिहारीच्या भूमिकेत दिसले होते. प्रत्येक सिन वर त्यांनी मारलेल्या पंच लाइनने प्रेक्षकांना खूप हसवले आहे.

मिस्टर इंडिया

1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मिस्टर इंडिया' चित्रपटात सतीश कौशिक यांनी कॅलेंडर नावाच्या एका स्वयंपाक्याची भूमिका केली होती. अनिल कपूर, श्रीदेवी आणि अमरीश पुरी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात सतीश कौशिकची व्यक्तिरेखा चांगलीच गाजली होती.

क्योंकि मैं झूठ नहीं बोलता

डेव्हिड धवन या विनोदी चित्रपटात गोविंदा आणि सुष्मिता यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटामध्ये सतीश कौशिकने गोविंदाचा मित्र मोहन ची भूमिका साकारली होती जो चित्रपटात वकील होता, चित्रपटात त्याने केवळ विनोदच केला नाही तर मित्रांशी कसे राहायचे हेदेखील आपल्या पात्रातून सांगितले आहे. या सर्व पात्रांनी सतीश कौशिकने आपल्या अभिनयाने वेड लावले होते.

संबंधित बातम्या