Ashram 3 : 'बाबा निराला' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; मोशन व्हिडिओ रिलीज

Ashram 3 Motion video Release : वेब सीरिजच्या तिसऱ्या भागाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत.
Ashram 3 : 'बाबा निराला' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; मोशन व्हिडिओ रिलीज
Ashram 3 Motion video ReleaseDainik Gomantak

Ashram 3 Motion video Release : बॉबी देओलच्या बहुप्रतिक्षित वेब सीरिज 'आश्रम 3' चा मोशन पोस्टर व्हिडिओ रिलीज झाला आहे. या व्हिडिओमध्ये सीझन 3 चा लोगो स्पष्टपणे दिसत आहे. मागील पार्श्वभूमीत आगीच्या ज्वाळा दिसत आहेत. हा मोशन व्हिडिओ रिलीज होताच या वेब सीरिजच्या तिसऱ्या भागाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. (Ashram 3 Motion video Release)

Ashram 3 Motion video Release
Nykaa CEO Falguni Nayar : देशातील पहिली सेल्फमेड महिला अब्जाधीश!

हा मोशन व्हिडिओ ईशा गुप्ता आणि बॉबी देओलने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यानंतर चाहते सतत या मोशन व्हिडिओवर कमेंट करत आहेत.

'आश्रम 3' वेब सिरीज कधी रिलीज होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र हा मोशन व्हिडीओ रिलीज होताच चाहत्यांना लवकरच आश्रम वेब सिरीजचा तिसरा भाग पाहायला मिळणार हे निश्चित आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान या वेब सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता संदीपने सांगितले होते की, शूटिंग आणि डबिंगचे काम पूर्ण झाले असून लवकरच नवीन सीझन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या वेब सीरिजमध्ये बॉबी देओलने बाबा निरालाची अशी भूमिका साकारली की तो लोकांच्या मनात घर करून गेला. या वेब सिरीजची कथा काशीपूर या काल्पनिक शहरावर आधारित आहे. बाबा लोकांना आश्रमाशी जोडण्यासाठी कसे प्रवृत्त करतात हे वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. या वेब सिरीजची कथा ड्रग्ज, बलात्कार आणि राजकारणाभोवती फिरते. प्रकाश झा यांनी या वेब सिरीजचे दिग्दर्शन केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.