Aamir Khan: आता बास झाले... 'इतकी' वर्षे घेणार ब्रेक!

काय म्हणाला बॉलीवुडचा मिस्टर परफेक्शनिस्ट; लाल सिंग चड्ढा अपयशी ठरल्याने निर्णय
Aamir Khan
Aamir KhanDainik Gomantak

Aamir Khan: बॉलीवुडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमीर खान आता चित्रपटांतून काही काळ ब्रेक घेणार आहे. जवळपास 35 वर्षांपासून आमीर बॉलीवुडमध्ये काम करत आहे. पण या वर्षी त्याच्या 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.

Aamir Khan
Shubhman Gill-SaRa Ali Khan: सारा का सारा सच है!

काही दिवसांपुर्वीच आमीरने एका चॅट शोमध्ये चित्रपटांतून ब्रेक घेण्याचा विचार बोलून दाखवला होता. त्याने त्यासाठी मानसिक तयारी केली आहे. आमीर म्हणाला की, मी एखादा चित्रपट करतो तेव्हा त्यात रमून जातो. तेव्हा माझ्या आयुष्यात इतक काहीही नसते. चॅम्पियन्स चित्रपटाची कथा मला आवडली होती. पण मला वाटले की मला एका ब्रेकची गरज आहे.

जेणेकरून मी कुटूंबाला, आईला, मुलांना वेळ देऊ शकेन. 35 वर्षे काम करत असताना जवळच्या लोकांवर अन्यायच झाला आहे. त्यामुळे काही काळ त्यांच्यासोबतही व्यतीत करायला हवा, असे वाटते. त्यामुळे जीवनाचा एक वेगळा अनुभवही येईल. त्यामुळे दीड वर्ष आता काहीही काम करणार नाही.

लाल सिंग चड्ढा चित्रपट अपयशी ठरल्यापासून आमीर निराश झाला आहे. त्यानंतर फॉर अ चेंज म्हणून तो काही काळ अमेरिकेलाही जाऊन आला. पण आता आमीरने चक्क काही काळ थांबण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. आमीर आता आगामी दीड वर्षे कोणताही चित्रपट करणार नाहीय. हा संपुर्ण वेळ आमीर आता त्याच्या कुटूंबाला देणार आहे.

Aamir Khan
IFFI 2022 Goa: 'इफ्फी'त स्पॅनिश फिल्ममेकर कार्लोस सौरा यांचा सत्यजित रे जीवन गौरव पुरस्काराने गौरव होणार

खरं तरं आमीरच्या आगामी चित्रपटाची चर्चा सुरू झाली होती. स्पॅनिश चित्रपटाचा रीमेक असलेल्या 'चॅम्पियन्स' या चित्रपटात आमीर दिसणार असल्याची चर्चा होती. पण आमीरने ही भुमिका नाकारल्याची माहिती आहे. या चित्रपटाची निर्मिती आमीरच करणार होता. पण लाल सिंग चड्ढा वाईटरितीने अपयशी ठरल्यामुळे आमीरने थांबण्याचा निर्णय घेतला आहे.

लाल सिंग चड्ढा हा हॉलीवुडच्या 'फॉरेस्ट गम्प' या सर्वांगसुंदर क्लासिक चित्रपटाचा रीमेक आहे. अर्थात हा चित्रपट आमीरने कथेशी प्रामाणिक न राहता, सोयीने बनवला होता, अशी टीका त्याच्यावर झाली. त्यामुळेच मूळ चित्रपटाच्या चाहत्यांना हा रीमेक रूचला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com