बॉलिवूडच्या खिलाडीला कोरोनाची लागण 

दैनिक गोमन्तक
रविवार, 4 एप्रिल 2021

देशभरात कोरोना विषाणूचा प्रभाव पुन्हा वाढल्याचे निदर्शनास येत आहे. सामान्य जनतेपासून बॉलिवूड इंडस्ट्रीला देखील या विषाणूमुळे सर्वाधिक त्रास सहन करावा लागला आहे.

देशभरात कोरोना विषाणूचा प्रभाव पुन्हा वाढल्याचे निदर्शनास येत आहे. सामान्य जनतेपासून बॉलिवूड इंडस्ट्रीला देखील या विषाणूमुळे सर्वाधिक त्रास सहन करावा लागला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यासंदर्भात असो अथवा सेलिब्रेटींना या विषाणूची लागण असो. आता पुन्हा एकदा चित्रपट सृष्टीत कोरोनाच्या विषाणूने एंट्री मारली असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार, रणवीर कपूर आणि आलीया भट्ट या सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. 

अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ चा नवा विक्रम

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अक्षय कुमारने आपला अहवाल सकारात्मक आल्याची माहिती सोशल मीडियाच्या ट्विटरवरून दिली आहे. याशिवाय, अक्षय कुमारने संपर्कात आलेल्या सर्वांना कोविड टेस्ट करवून घेण्याचे आवाहन केले आपल्या ट्विट मधून केले आहे. अक्षय कुमारने ट्विटरवर ट्विट करताना, आज सकाळी आपल्या कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्याचे सांगितले. शिवाय यामुळे आपण कोरोना संबंधित सर्व नियमावलीचे पालन करत असून, स्वतःला क्वारंटाईन केले असल्याची माहिती अक्षय कुमारने दिली आहे. यानंतर, आपण घरीच असून वैद्यकीय सुविधा घेत असल्याचे खिलाडीने म्हटले आहे. 

दरम्यान, यापूर्वी रणवीर कपूर, आलिया भट्ट, कार्तिक आर्यन, आमिर खान आणि आर माधवन यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. अभिनेता रणवीर कपूरची कोरोना चाचणी 9 मार्च रोजी पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्याची आई नीतू कपूर यांनी सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम वरून दिली होती. यानंतर आलिया भट्ट, कार्तिक आर्यन यांनी देखील सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम वरून आपला कोरोना अहवाल सकारात्मक आल्याचे म्हटले होते.  

संबंधित बातम्या