'वन्स अपॉन द टाईम इन मुंबई' फेम अभिनेत्याची गळफास घेऊन आत्महत्या

गोमंतक ऑनलाईन टीम
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

दरम्यान, मृत बसरा याचे पार्थिव शरीर पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांना काही प्राथमिक माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे

धर्मशाळा- बॉलिवू़ड अभिनेता आसिफ बसरा याने आत्महत्या केली आहे. आज हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्याच्या धर्मशाळामध्ये बसरा याने जोगीवाडा रोडवरील एका कॅफेमध्ये आत्महत्या केली आहे. बसरा याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून याबाबत अधिक तपास सुरू आहे.  

दरम्यान, मृत बसरा याचे पार्थिव शरीर पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांना काही प्राथमिक माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे. बसरा याने मागील पाच वर्षांपासून मैक्लोडगंज येथे भाड्याने एक घर घेतले होते. त्यात तो आणि त्याची एक परदेशी मैत्रिण राहत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

कशी केली आत्महत्या-     

 आसिफ बसरा हा युकेमधील एका महिलेसोबत लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. आज दुपारी तो आपल्या पाळीव श्वानाला घेऊन फिरायला निघाला. फिरून घरी परत आल्यावर त्याने त्या श्वानाला बांधलेली दोरी लावूनच फाशी घेतली. तो डिप्रेशनमध्ये असल्याची माहितीही प्राथमिक तपासात समोर आली आहे. कांगडाचे पोलीस अधीक्षक विमुक्त रंजन यांनी या घटनेची माहिती दिली असून याबाबतीत अधिक तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. 

कोण होता आसिफ बसरा

आसिफ बसरा प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आहे. अनेक बॉलिवूडच्या चित्रपटांमधून त्याने काम केले आहे. 'परजानियां', 'ब्लॅ्क फ्रायडे' याशिवाय हॉलिवूडचा चित्रपट 'आउटसोर्स'मध्येही त्याने भूमिका साकारली आहे. हिमाचलमधील चित्रपट 'सांझ'साठी बसरा याला विशेष मिळाली आहे. इमरान हाश्मी याचा 'वन्स अपॉन द टाइम इन मुंबई' या चित्रपटातही त्याने हाश्मी याच्या वडिलांचे पात्र साकारले होते.  

संबंधित बातम्या