बर्थडे पार्टीत गोविंदाची धमाल; व्हिडिओ झाला व्हायरल

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 22 डिसेंबर 2020

बॉलिवूड अभिनेता गोविंदाचा नुकताच 57 वा वाढदिवस झाला. आणि त्याने यानिमित्ताने त्याच्या घरी त्यांनी पार्टी आयोजित केली होती,

मुंबई: बॉलिवूड अभिनेता गोविंदाचा नुकताच 57 वा वाढदिवस झाला. आणि त्याने यानिमित्ताने त्याच्या घरी त्यांनी पार्टी आयोजित केली होती, ज्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आणि तो प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडला आहे. 

या व्हिडिओमध्ये गोविंदा आपल्या प्रसिद्ध चित्रपटांच्या गाण्यांवर नाचताना दिसत आहे. तो अभिनेता शक्ति कपूरबरोबर हिरो नंबर 1च्या  'मैं पैदल से जा रहा था' गाण्यावर नाचत आहे, आणि गाण्याचा आनंद लुटत आहे, त्यानंतर गोविंदा पत्नी सुनीता आहुजासोबत नाचताना दिसला. वयाच्या 57 व्या वर्षीही त्याने स्वत:ला नृत्याशी बांधून ठेवले आहे. कॉमेडियन कपिल शर्मा सुद्धा गोविंदाच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये उपस्थित होता अशी माहीती सुत्रांकडून मिळाली.

आणखी वाचा:

व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनलतर्फे अमिताभ बच्चन पुरस्कार सलोनी साखरदांडे यांना -

संबंधित बातम्या