CORONA: माझ्या देशाचे लोकं मरत आहेत प्लिज हेल्प करा...

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 29 एप्रिल 2021

कोरोनामुळे संक्रमित रूग्णांना रुग्णालयात बेड मिळत नाही, ना औषधोपचार, ना ऑक्सिजन.अशातच बॉलिवू़ड अभिनेत्री प्रियंका चोप्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई: कोरोनाव्हायरसच्या दुसर्‍या लाटेमुळे देशातील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे अत्यंत वाईट परिस्थितीचा सामना भारत देश करत आहे. कोरोनामुळे संक्रमित रूग्णांना रुग्णालयात बेड मिळत नाही, ना औषधोपचार, ना ऑक्सिजन. अशा परिस्थितीत बॉलिवूड इंडस्ट्रीत असे अनेक तारे आहेत जे गरजूंना मदत करण्यात नेहमीच पुढाकार घेत असतात. अशातच बॉलिवू़ड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना सतत मदत करण्याचे आवाहन करत असते. त्याचबरोबर प्रियंका चोप्रा आणि तिचा नवरा निक नेहमीच मदतीसाठी तयार असतात.  प्रियंका सध्या लंडनमध्ये आहे. पण, मुंबईची सध्य परिस्थिती पाहता तीला फार वाईट वाटले आहे.

प्रियंका चोप्राने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याद्वारे तिने लोकांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. व्हिडिओ शेअर करताना तीने विस्तृत कॅप्शनही लिहिले आहे. 'भारत माझा देश आहे, माझे घर आहे. जिथे सध्या कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आपल्या सर्वांना मदतीची गरज आहे. रेकॉर्ड स्तरावर लोक मरत आहेत. हो रोग सर्वत्र झपाट्याने पसरत आहे आणि लोकांचा जीव घेत आहे. असे तीने व्हिडिओला कॅप्शन देतांना लिहिले आहे.

अरे हाड! नागडा देश, नागडं सरकार 

'कोविड रिलीफसाठी गीव्हइंडियाच्या( GiveIndia) सहकार्याने मी एक निधी गोळा करणारी संस्था स्थापित केली आहे. आपण यात जे काही योगदान देऊ शकता ते दान करा त्याचा आपल्या देशाला चांगला फायदा होइल. येथे जवळपास 63 दशलक्ष लोक मला फॉलो करतात,  तुम्ही लोकांना दहा डॉलर्स जरी दिले तरी ते 1 दशलक्ष डॉलर्स होणार आहे. जी एक मोठी रक्कम आहे. आपली देणगी थेट हेल्थकेअर इन्फ्रास्ट्रक्चरवर जाणार असे प्रियंकाने सांगितले आहे.

'कृपया देणगी द्या. मी आणि निक नेहमीच मदत करत राहतो. कोरोना विषाणू किती झपाट्याने पसरत आहे. जोपर्यंत प्रत्येकजण सुरक्षित नाही, तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही. आपल्याला या विषाणूचा पराभव करावा लागेल त्यासाठी एकमेकांना सर्वांनी सहकार्य करणे गरजेचं आहे,' असे आवाहन प्रियंकाने केले आहे.

संबंधित बातम्या