अभिनेता रितेश देशमुखनेही केले शेतकरी आंदोलनाचे समर्थन; म्हणाला...

गोमंतक ऑनलाईन टीम
शनिवार, 5 डिसेंबर 2020

कृषी कायद्याविरोधात होत असलेल्या आंदोलनांमुळे देशाची राजधानी थंडीतही तापली आहे. पंजाब आणि हरियाणा या राज्यांशिवाय दुसऱ्या राज्यांचे शेतकरीही या आंदोलनासाठी दिल्लीत पोहचत आहेत. याच दरम्यान, समाज माध्यमांवरही या आंदोलनाला खूप समर्थन मिळत आहे.

मुंबई-  कृषी कायद्याविरोधात होत असलेल्या आंदोलनांमुळे देशाची राजधानी थंडीतही तापली आहे. पंजाब आणि हरियाणा या राज्यांशिवाय दुसऱ्या राज्यांचे शेतकरीही या आंदोलनासाठी दिल्लीत पोहचत आहेत. याच दरम्यान, समाज माध्यमांवरही या आंदोलनाला खूप समर्थन मिळत आहे. बॉलिवूडमधील चेहरेही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवणाऱ्या पोस्ट रोज करत आहेत. याच यादीत महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा आणि प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखचेही नाव जोडले गेले आहे. 

रितेशने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ केलेल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, 'जर आपण आज अन्न खात असाल तर त्यासाठी शेतकऱ्यांना धन्यवाद द्या.' यासाठी त्याने #JaiKisaan हा हॅश टॅगही वापरला आहे. रितेशच्या ट्विटवर त्याचे चाहते चांगलेच खुश झाले असून अनेकांनी त्याची प्रशंसाही केली आहे. 

पंजाबी सिनेसृष्टीतील गायक गिप्पी ग्रेवाल याने मात्र, बॉलिवूडमधील लोक मोठ्या प्रमाणावर या आंदोलनाच्या समर्थनात येत नसल्याचे म्हटले आहे. गिप्पीने बॉलिवूडवर टीका करताना म्हटले आहे की, राज्यातील शेतकऱ्यांच्या आंदोलना दरम्यान त्यांना पाठिंबा देण्याच्या काळात बॉलिवूड पंजाबच्या बाजूने उभे राहिले नाही.  

संबंधित बातम्या