...पण अशा लोकांसह आपण कोरोना विरुद्धची लढाई जिंकू शकू का?

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

भाजपा तामिळनाडूचे सदस्य माझा फोन नंबर लीक करीत आहेत आणि लोकांना मला त्रास देण्यास सांगत आहेत. कदाचित आपण कोरोना विरुद्धची लढाई लढू पण अशा लोकांसह आपण जिंकू शकू का?" असा प्रश्न ही त्याने ट्विटकरून उपस्थित केला आहे.

अभिनेता सिद्धार्थचे म्हणणे आहे की त्याचा फोन नंबर लीक झाला आहे आणि त्याला आणि त्याच्या कुटूंबाला जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे. तमिळनाडू भाजप आणि आयटी सेलने हे सर्व केल्याचा आरोप सिद्धार्थने  केला आहे. बॉलिवूड आणि दक्षिण चित्रपट अभिनेता सिद्धार्थने एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की त्याचा फोन नंबर लीक झाला आहे आणि त्याला आणि त्याच्या कुटूंबाला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. तमिळनाडू भाजप आणि आयटी सेलने हे सर्व केल्याचा आरोप सिद्धार्थ केला आहे.(Bollywood actor Siddharth has accused Tamil Nadu BJP and IT cell)

सिद्धार्थने ट्वीट करून हा आरोप केला आहे. "माझा फोन नंबर तामिळनाडूच्या भाजपा सदस्य आणि तमिळनाडू आयटी सेलने लीक केला आहे. गेल्या 24 तासांत आतापर्यंत 500 हून अधिक शिव्या आणि मृत्यूच्या धमक्या, रेप कॉल्स मला आणि माझ्या कुटुंबीयांना आले आहेत. मी हे सर्व फोन कॉल्स रेकाॉर्ड केले आहेत आणि ते पोलिसांना दिले आहेत. मी गप्प बसणार नाही, प्रयत्न करत राहणार," असे  सिद्धार्थने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर त्याने आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना टॅग केले आहे.

सिद्धार्थने दुसर्‍या ट्विटमध्ये मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. "सोशल मीडियाच्या अनेक पोस्टांपैकी ही एक पोस्ट आहे, ज्यामध्ये भाजपा तामिळनाडूचे सदस्य माझा फोन नंबर लीक करीत आहेत आणि लोकांना मला त्रास देण्यास सांगत आहेत. कदाचित आपण कोरोना विरुद्धची लढाई लढू पण अशा लोकांसह आपण जिंकू शकू का?" असा प्रश्न ही त्याने ट्विटकरून उपस्थित केला आहे.

सिद्धार्थने बॉलिवूड चित्रपटांसोबतच दक्षिण चित्रपटांमध्येही काम केले आहे. सिद्धार्थ हा रंग दे बसंती या हिट चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत आमिर खान आणि आर माधवन देखील होते. त्याचा 'चश्मे बडदूर' हा चित्रपटही लोकांना खूप आवडला होता.

संबंधित बातम्या