दियाच्या घरी चिमुकल्याचं होणार आगमन

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

मालदिवमधील फोटो सोशल मिडियावर शेअर करत दियाने आपल्या चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे.

सध्या सोशल मिडियावर दिया मिर्झाची चांगलीच चर्चा रंगली आहे. या चर्चेचं कारणही तसचं काहीतरी आहे. दियाच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचा आगमन होणार आहे. दियाने ही गोड बातमी आपल्या सोशल मिडिया आकाउंटवरुन दिली आहे.

दिया मालदिवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. मालदिवमधील फोटो सोशल मिडियावर शेअर करत दियाने आपल्या चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे. गाणी, गोष्टी, अंगाई गीते अशा सगळ्या गोष्टींची लगबग लवकरच सुरु होणार असल्याचे दियाने आपल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. माझ्या गर्भाशयामध्ये एक सुंदर स्वप्न वाढत आहे अशा आशयाचे कॅप्शन दियाने दिले आहे. (Bollywood actress diya mirza is pregnant)

सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषीत

दिया सध्या तिचा पती वैभव रेखी आणि सावत्र मुलगी समायरा यांच्यासोबत मालदिवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहेत. या सुट्ट्याचे फोटो ती सोशल मिडियावर सतत आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. दियाने वैभव रेखी यांच्यसोबत लग्नगाठ बांधली आहे. तिचं हे लग्नही अनेकांच्या चर्चेचा विषय ठरलं. दियाने लग्नामध्ये जास्तीत जास्त विघटनशील आणि पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर केला होता. विशेष म्हणजे तिच्या या लग्नाचे पौरोहित्य एका महिलेने केलं होतं.

दियाने यापूर्वी 2014 मध्ये साहील सांघा याच्याशी विवाह केला होता. मात्र 2019 मध्ये दोघे विभक्त झाले होते. वैभव रेखीसोबत दियाचा दुसरा विवाह केला.

 

संबंधित बातम्या