बॉलिवूड अभिनेत्रीला एका मुलीकडूनच मिळताहेत बलात्काराच्या धमक्या

गोमंतक ऑनलाईन टीम
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

याबाबत झारा खानने मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली असून याबाबत पोलिसांनी प्राथमिक तपासही लावला आहे. 

मुंबईृ- ब्रिटिश-भारतीय अभिनेत्री आणि गायिका सलमा आगा यांची मुलगी झारा खानला इंस्टाग्रॅमवरील एका अनोळखी अकाउंटवरून बलात्काराच्या धमक्या मिळत आहेत. याबाबत झारा खानने मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली असून याबाबत पोलिसांनी प्राथमिक तपासही लावला आहे. 

'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईच्या ओशिवारा पोलिसांनी केलेल्या तपासानुसार धमक्या देणारे अकाउंट एका मुलीचे असून ती हैदराबाद येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिचे वय 23 वर्ष असून ती एमबीएची विद्यार्थिनी आहे. संशयितेची मानसिक अवस्था विचलित असून तीने हा संदेश का पाठवला यामागील कारण मात्र, अजून स्पष्ट झालेले नाही. या घटनेमागील कारण स्पष्ट झाल्यानंतरच तिला अटक केली जाण्याची शक्यता आहे.  

दरम्यान, 1982मध्ये प्रदर्शित झालेल्या 'निकाह' या चित्रपटामुळे अभिनेत्री सलमा आगा अत्यंत लोकप्रिय झाल्या होत्या. त्यांची मुलगी झारा हिनेही बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'औरंगजेब' आणि 'देसी कट्टे'च्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 

संबंधित बातम्या