Salaam Venky Trailer Out: काजोलसह रुपेरी परद्यावर झळकणार बॉलिवूडचा 'हा' सुपरस्टार

Salaam Venky Trailer Out: बॉलिवूड अभिनेत्री काजोल बऱ्याच काळानंतर सिल्व्हर स्क्रीनवर झळकणार आहे.
Salaam Venky Trailer Poster
Salaam Venky Trailer Poster Dainik Gomantak

Salaam Venky Trailer Out: बॉलिवूड अभिनेत्री काजोल बऱ्याच काळानंतर सिल्व्हर स्क्रीनवर झळकणार आहे. काजोलच्या सलाम वेंकी (Salaam Venky) या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर खूपच भावनिक असून, काजोलने चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर तिच्या इंस्टाग्राम अकऊंटवर शेअर केला आहे. महत्त्वाचं म्हणजे या ट्रेलरमध्ये काजोलसोबत बॉलिवूडचा एक सुपरस्टारही दिसत आहे.

दरम्यान, चित्रपट (Movie) एक आजारी मुलगा ज्याला वाचवण्यासाठी आई शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार करते अशी चित्रपट थीम आहे. सलाम वेंकीच्या ट्रेलरच्या शेवटी एक मोठे सरप्राईज देखील आहे. ते म्हणजे या सिनेमात काजोलसोबत बॉलिवूडचा एक सुपरस्टार दिसणार आहे.

Salaam Venky Trailer Poster
IFFI 2022 Goa: 'इफ्फी'त स्पॅनिश फिल्ममेकर कार्लोस सौरा यांचा सत्यजित रे जीवन गौरव पुरस्काराने गौरव होणार

'सलाम वेंकी' या चित्रपटातून काजोल पुन्हा एकदा रुपेरी परद्यावर परतणार आहे. काजोल शेवटची तान्हाजी या चित्रपटात अजय देवगण सोबत दिसली होती. तान्हाजी चित्रपटात तिची भूमिका खूपच कमी होती. मात्र आता काजोलच्या नवीन चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटात काजोल एका आईच्या भूमिकेत दिसत आहे. ज्यात तिचा मुलगा एका गंभीर आजाराशी झुंज देतांना दिसतो आहे.

काजोलच्या चित्रपटात बॉलीवूडचा सुपरस्टार आमिर खानचा (Amir Khan) कॅमिओ दिसणार आहे. ट्रेलरच्या शेवटी आमीर खान दिसत असून त्यामुळे चित्रपटाताची उत्सुकताही चांगलीच वाढली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com