प्रियांका जाहीर करणार बाफ्टा इंटरनॅशनल अवॉर्ड 

प्रियांका जाहीर करणार बाफ्टा इंटरनॅशनल अवॉर्ड 
Bollywood Actress Priyanka to announce BAFTA International Award

नवी दिल्ली: हिंदी चित्रपटांबरोबरच हॉलीवूडचे चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या अभिनेत्री प्रियांका चोप्राने नुकतीच ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची नामांकने जाहीर केली होती. आता पुन्हा एकदा प्रियांका एकe मानाच्या आणि महत्त्वाच्या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होत आहे. 74 वा ब्रिटिश अकॅडमीचा बाफ्टा चित्रपट पुरस्कार जाहीर करण्याची संधी प्रियांकाला मिळाली आहे.

हा सोहळा 10 आणि 11 एप्रिल रोजी रॉयल अल्बर्ट हॉल इथे होणार आहे. सध्या प्रियांका चोप्रा लंडनमध्ये आहे. विशेष बाब म्हणजे प्रियांकाच्या ‘द व्हाईट टायगर’ चित्रपटाला या पुरस्कारांमध्ये दोन नामांकने मिळाली आहेत. प्रियांकाबरोबरच हॉलीवूडचे काही स्टार्सही या वेळी सहभागी होत आहेत. प्रियांकाने सोशल मीडियावर याबाबतची बातमी दिली आहे. तिने लिहिले आहे, की ‘‘माझा हा सन्मान आहे. हे पुरस्कार रविवारी जाहीर करणार आहे. मी हे पुरस्कार जाहीर करण्यासाठी कमालीची उत्सुक आहे.’’

ऑस्करनंतर प्रियांका चोप्रा आणखी एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करणार आहे. 74 व्या ब्रिटीश अ‍ॅकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स अर्थात बाफ्टा पुरस्कार करण्याची संधी बॉलिवूड अभिनेत्री प्रियांकाला मिळाला आहे. याविषयीची माहिती अभिनेत्रीने सोशल मीडियावर दिली. "या रविवारी बाफ्टा पुरस्कार सादर करण्यात मला अभिमान वाटत आहे आणि खूप आनंदही झाला आहे, असे तिने सोशल मिडियावर लिहिले आहे. प्रियंका चोप्रा सद्या लंडनमध्ये तीच्या आगामी हॉलिवूड चित्रपट मॅट्रिक्स 4 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. गेल्याच महिन्यात तीने लंडनमध्येच होळीचा सणही साजरा केला होता.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com