Sidharth Malhotra-Kiara Advani: ठरलं! सिद्धार्थ-कियारा 'या' ठिकाणी घेणार सात फेरे...

लवकरच तारखेची घोषणा होणार; दोघांच्याही कुटूंबांकडून तयारीला सुरूवात
Kiara Advani Siddharth Malhotra
Kiara Advani Siddharth MalhotraDainik Gomantak

Siddharth Malhotra-Kiara Advani Marriage: बॉलीवुडमधील अलीकडच्या काळातील चर्चेत असलेले कपल म्हणजे अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणी. या दोघांच्या लग्नाच्या चर्चा गेल्या काही काळापासून सुरू होत्या. मात्र आता त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होऊ शकते. कारण या दोघांनी वेडिंग डेस्टिनेशन निश्चित्त केल्याचे सांगितले जात आहे.

Kiara Advani Siddharth Malhotra
Sara Ali Khan: सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत सारा अली खानने लिहीली भावनिक पोस्ट...

सूत्रांच्या माहितीनुसार सिद्धार्थ आणि कियारा हे दोघेही पंजाबची राजधानी चंदीगड येथे लग्न करणार असल्याचे समजते. मल्होत्रा आणि आडवाणी कुटूंबाने या लग्नाची तयारीही सुरू केल्याचे समजते. लवकरच लग्नाच्या तारखेची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार सिद्धार्थ आणि कियाराने लग्नासाठी दोन ठिकाणे निश्चित्त केली होती. पण नंतर चंदीगडवर शिक्कामोर्तब करण्यात आले. चंदीगडमधील ओबेरॉय सुखविलास हॉटेलची निवड त्यांनी केली आहे. चंदीगड दिल्लीपासून जवळ आहे. सिद्धार्थचे कुटूंबीय दिल्लीत राहतात. त्यामुळे त्यांच्यासाठीही ते सोयीचे असणार आहे. त्यानंतर मुंबईत हे दाम्पत्य ग्रँड रिसेप्शन पार्टी देणार आहे.

Kiara Advani Siddharth Malhotra
Alia-Ranbir Married Life : आलियाने उघड केले तिच्या आणि रणबीरच्या सेक्स लाईफचे रहस्य; म्हणाली...

काही दिवसांपुर्वी शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी करन जोहरच्या कॉफी विथ करन या शोमध्ये आले होते तेव्हा शाहिदने या वर्षीच्या अखेरीस कियारा-सिद्धार्थ लग्न करू शकतात, असे संकेत दिले होते. शाहिदच्या वक्तव्याने सोशल मीडियात खळबळ माजली होती. तेव्हापासूनच चाहत्यांना या दोघांच्या लग्नाचे वेध लागले आहेत.

कियाराने 2014 मध्ये 'फगली' चित्रपटातून बॉलीवूड डेब्यु केला होता. त्यानंतर शेरशाह, भूल भुलैया 2, जुग जुग जियो असे चित्रपट तिने केले आहेत. आगामी 'सत्यप्रेम की कथा', 'गोविंदा नाम मेरा' मध्येही ती दिसणार आहे. तर सिद्धार्थ 'मिशन मजनू' मध्ये रश्मिका मंदानासोबत दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com