एनसीबीकडून 'दिया मिर्झा'च्या मॅनेजरला ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक

वृत्तसंस्था
रविवार, 10 जानेवारी 2021

एनसीबी (नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो) ड्रग्स प्रकरणात आत्तापर्यंत बॉलिवबडच्या अनेक बड्या कलाकारांना समन्स पाठवलेले आहेत. त्यात आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे.

मुंबई : एनसीबी (नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो) ड्रग्स प्रकरणात आत्तापर्यंत बॉलिवबडच्या अनेक बड्या कलाकारांना समन्स पाठवलेले आहेत. त्यात आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. हा व्यक्ती अभिनेत्री व निर्माती दिया मिर्झाच्या संपर्कातील असून, तो दियाचा गतपूर्वीचा मॅनेजर असल्याची बातमी मिळाली आहे. रहिला फर्नीचरवाला असं त्याचं नाव असून, त्याची बहिण आणि इतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे. यांचा घरून गांजा जप्त केल्यानंतर एनसीबीने यांना अटक केली. 

यापूर्वीही बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन प्रकरणी एनसीबीकडून अनेक सेलिब्रिटींची चौकशी करण्यात आली आहे. यात अर्जुन रामपाल, रकुल प्रीत, दीपिका पदुकोण, सारा अली खान, कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया याचा समावेश आहे. 

संबंधित बातम्या