बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन कोरोना पॉझिटिव्ह

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 23 मार्च 2021

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनचा कोरोना चाचणी अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर खुद्द कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर एक पोस्ट प्रसिद्ध करून याबद्दल माहिती दिली आहे.

मुंबई: संपूर्ण देशात कोरोनाची लस घेण्याची प्रक्रिया सुरू असताना, दुसरीकडे कोरोनाची नवीन प्रकरणे समोर येत आहेत. बॉलिवूडबद्दल बोलायचे तर रणबीर कपूर, सतीश कौशिक सारख्या सेलेब्रिटींना गेल्या काही दिवसांत कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. त्याचबरोबर बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनचा कोरोना चाचणी अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर खुद्द कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर एक पोस्ट प्रसिद्ध करून याबद्दल माहिती दिली आहे.(Bollywood famous actor Karthik Aryan Corona positive)

कार्तिक आर्यनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये बिग प्लस चिन्ह दिसत आहे. प्लसच्या चिन्हाद्वारे कार्तिकने हे सांगण्याचा प्रयत्न केला की तो कोरोना पॉझिटिव्ह आहे. ही पोस्ट शेअर करताना कार्तिकने कॅप्शनमध्ये लिहिले आहे 'मी पॉझिटिव्ह आहे माझ्यासाठी प्रार्थना करा' असे कॅप्शन त्याने पोस्ट ला दिले आहे.

मला का शिव्या शाप दिला जातो? म्हणत अंकिताने शेअर केल्या सुशांतसोबतच्या खास गोष्टी 

चाहत्यांनी या पोस्टवर गेट वेल सुन म्हण त कमेंट केल्या आहेत. प्रत्येकजण या बातमीवर आपली चिंता व्यक्त करताना दिसत आहे. यासह, कार्तिकचे अनेक चाहतेसुद्धा त्याच्या लवकर बरे होण्याकरिता प्रार्थना करताना दिसतात. त्याचबरोबर अनेक सेलिब्रिटींनीही या पोस्टवर कमेंट केली आहे. कार्तिक आर्यन आपल्या आगामी प्रोजेक्टमध्ये 'धमाका', 'भूल भुलाय 2', 'दोस्ताना 2' सारख्या चित्रपटांचा बिझी आहे. 'भूल भुलैया 2' चित्रपटातील कार्तिकचा धमाकेदार लूकही समोर आला आहे.

संबंधित बातम्या