उदयपूर हत्याकांडावरुन या फिल्म मेकरने जावेद अख्तरवर साधला निशाणा

उदयपूरमध्ये टेलर कन्हैया लालच्या हत्येनंतर सोशल मीडियावर लोक रोष व्यक्त करत आहेत.
 Javed Akhtar
Javed AkhtarDainik Gomantak

Udaipur Murder Case: उदयपूरमध्ये टेलर कन्हैया लालच्या हत्येनंतर सोशल मीडियावर लोक रोष व्यक्त करत आहेत. राजकीय नेत्यांपासून ते हिंदी चित्रपटसृष्टीपर्यंत प्रत्येकजण या हिंसाचाराच्या विरोधात आवाज उठवत आहे, मात्र याचदरम्यान बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने हिंदी चित्रपट लेखक जावेद अख्तर यांचा खरपूस समाचार घेतला आहे. वास्तविक, या मुद्द्यावर जावेद अख्तर यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. (Bollywood Film Maker Ashok Pandit Comment On Javed Akhtar For Udaipur Murder Case)

या चित्रपट निर्मात्याने जावेद अख्तर यांना लक्ष्य केले

एकीकडे, अनेक सेलिब्रिटींनी (Celebrities) उदयपूरच्या घटनेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असताना दुसरीकडे, देशाच्या प्रत्येक प्रश्नावर आपले मत मांडणारे लेखक जावेद अख्तर यांच्या वतीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यावर आता प्रसिद्ध चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्यावर निशाणा साधला आहे. खरं तर, अशोक पंडित यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट केले आहे. ट्वीटमध्ये पंडीत म्हणाले की, 'आदरणीय जावेद अख्तर जी यांनी उदयपूर (Udaipur) घटनेबद्दल ऐकले असेल.' अशात अशोक पंडित यांच्या या टोमण्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

 Javed Akhtar
Udaipur: धमकीनंतर कन्हैया लालने मागितली होती सुरक्षा; पोलिसांनी केले दुर्लक्ष

लोकांनी अशी उत्तरे दिली

चित्रपट निर्माते अशोक पंडित (Ashok Pandit) यांनी जावेद अख्तर यांच्या विरोधात केलेल्या या ट्विटनंतर एका ट्विटर यूजरने लिहिले आहे की, 'अरे अशोक जी याबद्दल काय बोलताय, जावेद अख्तर या सगळ्या गोष्टींकडे कुठे लक्ष देतात. जावेद अख्तर यांच्या कानापर्यंत फक्त निवडक लोकांचा आवाज पोहोचतो.' यावर अनेक लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com