गोव्यातील सौंदर्याचा फिल्मी साक्षात्कार

बॉलीवूडने (Bollywood) गोव्यातील (Goa) अनेक ठिकाणांना नव्याने ओळख दिली आहे.
Goa
Goa Dainik Gomantak

आपण जिथे राहतो तिथल्या जागांना आपण इतके सरावलेले असतो की अनेकदा आपल्याला त्यांच्या सौंदर्याची जाणीवदेखील होत नाही. गोव्यात (Goa) तर गोमंतकीयांनी आपल्या या भूमीचे सौंदर्य गृहीतच धरलेले आहे. हिप्पी गोव्यात येईपर्यंत आणि त्यांनी इथल्या निवांत समुद्र किनाऱ्याची (जाऊ द्या, तो भूतकाळ झाला आहे) माहिती पाश्चिमात्य देशांना करून देईपर्यंत इथल्या समुद्र किनार्यांचे सौंदर्य आमच्या तरी कुठे लक्षात आले होते? समुद्रकिनाऱ्यावर बाबत हिप्पीनी जे केले तेच बॉलीवूडने (Bollywood) इतर अनेक जागांबाबत केले. स्थानिक जागांना सरावलेल्या आमच्या डोळ्यांना त्यातले सौंदर्य अगदीच जाणवले नव्हते असे नाही पण सवयीने ते अगोचर झाले होते. बॉलीवूडने आम्हाला या जागा विविध कोनाने पुन्हा दाखवल्या आणि आमच्याच बेंबीत लपलेल्या कस्तुरीचा थोडासा सुवास आम्हालाही जाणवून दिला. खरं तर आपल्याकडे लेन्समधून पाहण्याची दृष्टी असेल तरी अजूनही गोव्यातल्या अनेक जागांचे अतुलनीय सौंदर्य आपल्याला मदत मंत्रमुग्ध करेल. देवाने दिलेल्या डोळ्यातून दिसणाऱ्या अनेक गोष्टी आपण (नजर लागू नये म्हणून की काय...पण) सहजगत्या टाळतोच. नाही का?

दिवाडीचे बेट

दिवाडी बेटावरच्या, अगदी नाकासमोर दूर जाणार्‍या या रस्त्यावरचे हे झाड आता अगदीच ‘आयकॉनिक’ बनले आहे. ‘फाइंडिंग फॅनी’ या चित्रपटात दीपिका पडुकोण (Deepika Padukon) , अर्जुन कपूर, डिंपल कापडिया, पंकज कपूर वगैरे नामी मंडळींनी या झाडाजवळ बसून चर्चा केल्यानंतर हा रस्ता आणि एक झाड अगदीच नावारूपाला आले.

दिवाडीचे बेट
दिवाडीचे बेट Dainik Gomantak

शापोरा किल्ला

हा किल्ला तर आता ‘दिल चाहता है’ किल्ला बनलाय. ‘शापोरा किल्ला’ हे नाव तर आता इतिहासजमा झाले आहे. किल्ल्याला भेट देणाऱ्या (इतिहासाच्या प्रेमाने नव्हे) पर्यटकांना किल्ल्याची ओळख ‘दिल चाहता है’ अशीच करून दिली जाते. जेव्हा त्या किल्ल्याच्या तटांवर आमिर खान, अक्षय खन्ना आणि सैफ अली खान ही मंडळी आरूढ झाली तेव्हापासून या किल्ल्याचा इतिहासच बदलून गेला आहे.

शापोरा किल्ला
शापोरा किल्ला Dainik Gomantak

पर्राचा रस्ता

दोन्ही बाजूनी उंच माड असलेल्या बांधावरून आपण अनेकदा गेलो असू पण ‘डियर जिंदगी’ या चित्रपटात जेव्हा अशा रस्त्यावरून शाहरुख खान आणि आलिया भट सायकलिंग करत जातात तेव्हा उंच माडांमधून जाणारा हा अरुंद रस्ता आपल्या मनात एकदम रुंद होऊन जातो. केवळ हा रस्ता पाहण्यासाठी पर्यटक (Tourist) पर्राला जातील असा कोणी विचार तरी केला होता का?

पर्राचा रस्ता
पर्राचा रस्ता Dainik Gomantak

अवर लेडी ऑफ इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च

या चर्चच्या दिशेने जाणाऱ्या उभ्या-आडव्या पायऱ्या सरळसोट असत्या तर त्या दृश्यात एक प्रकारचे एक प्रकारची रटाळ ‘सिमेट्री’ तरी आली असती ती पण ती ‘सिमेट्री’ सौंदर्यशास्त्रीय पद्धतीने तोडून पायर्‍यांच्या रचनेला अतिशय छान अशी व्यामिश्रता रचनाकारांनी दिली. मात्र अनेक हिंदी सिनेमांमधून हे चर्च दिसेपर्यंत. त्या चर्च (Church) समोरून अनेकदा त्याचे हे सौंदर्य बेदखल करून आम्ही वळसा घेतला आहे.

अवर लेडी ऑफ इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च
अवर लेडी ऑफ इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च Dainik Gomantak

रायबंदर येथील अरुंद बोळाचा रस्ता

‘कभी हा, कभी ना’ पाहिलात का? रायबंदरवरून पणजीला येताना ‘अवर लेडी ऑफ अजुदा चर्च’ ओलांडल्यावर जो अरुंद बोळ लागतो तो या चित्रपटात (Movies) असे गूढरम्य वातावरण तयार करतो की तो अगदी दुसऱ्या विश्वातला बनून जातो. आपण अनेकदा या रस्त्याने गेलो असु पण सिनेमाच्या डोळ्याने आपण कधीही त्याकडे पाहिले नसेल.

रायबंदर येथील अरुंद बोळाचा रस्ता
रायबंदर येथील अरुंद बोळाचा रस्ता Dainik Gomantak

फोन्तिन्हास

हा भाग तर अनेक चित्रपटांसाठी आकर्षणाचा विषय बनलेला आहे. ‘गोवा’ ध्वनित करण्यासाठी इथली रंगीत घरे आणि बोळ दाखवले की आशयाला आपोआपच एक गोमंतकीय झळाळी येते. अर्थात चित्रपट निर्मात्यांसाठी आता हे अतिशय महागडे लोकेशन बनले आहे. (खरंतर तिथल्या रहिवाशांनी त्यांना होणाऱ्या त्रासामुळे शूटिंगला तिथे बंदीची मागणी केली आहे.)

फोन्तिन्हास
फोन्तिन्हास Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com