शिल्पा शेट्टी देणार राज कुंद्राला घटस्फोट..?

जाणून घ्या बातमीमागचे सत्य..
शिल्पा शेट्टी देणार राज कुंद्राला घटस्फोट..?
Bollywood News : Shilpa Shetty and Raj Kundra Divorce NewsDainik Gomantak

Bollywood News : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा (Shilpa Shetty and Raj Kundra) यांच्याशी संबंधित एका बातमीने (News) सगळ्यांचे होश उडवले असून शिल्पा आणि राज एकमेकांपासून वेगळे होणार असल्याच्या बातम्या येत होत्या सगळी कडे पसरल्या होत्या दरम्यान सतत्या बघायला गेलं तर शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि राज कुंद्रा यांचे संबंध गेले काही महिने चांगले गेले नाहीत.

Bollywood News : Shilpa Shetty and Raj Kundra Divorce News
शिल्पा शेट्टी राज कुंद्राला देतेय घटस्फोट ?

राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकल्यानंतर शिल्पा आणि कुटुंबाला खूप त्रास झाला आहे. राज तुरुंगात असताना शिल्पाबाबत इंटरनेटवर अनेक प्रकारच्या बातम्या येत होत्या. शिल्पाने राजचे घर सोडले असून आता ती घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार असल्याच्या बातम्या देखील आल्या होत्या. या रिपोर्ट्समध्ये शिल्पाच्या एका जवळच्या मैत्रिणीचे वक्तव्यही छापण्यात आले होते, ज्यामध्ये त्या मैत्रिणीने म्हटले होते की, शिल्पाने हे स्थान कठोर परिश्रमाने मिळवले असून तिचा राजच्या प्रॉपर्टीशी, व्यवसायाशी काहीही संबंध नाही.

तेव्हापासून दोघांच्या विभक्त झाल्याच्या बातम्या जोरात येऊ लागल्या. मात्र सत्य अगदी उलट आहे. राज आणि शिल्पाचा घटस्फोट झाल्यासारखा कोणताही सीन नाही. राजची जामिनावर सुटका झाल्यानंतर शिल्पा आणि पती आरामात आनंदी जीवन जगत आहेत. होय, या प्रकरणामुळे शिल्पा चांगलीच नाराज झाली आहे.

Bollywood News : Shilpa Shetty and Raj Kundra Divorce News
सिनेमांतून वाढणार खिलाडूवृत्ती..!

परंतु तिच्या पतीपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेण्याइतकी कमजोर नाही. शिल्पाने आपल्या पतीला पाठिंबा देण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.

या वर्षी जुलैमध्ये राज कुंद्रा यांना पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर ते अनेक महिने तुरुंगात होते. नंतर सप्टेंबर महिन्यात राजला जामीन मिळाला आणि त्याची जामिनावर सुटका झाली. या संपूर्ण प्रकरणामुळे शिल्पा आणि कुटुंबीय खूपच अस्वस्थ झाले. प्रकरण इतके वाढले की शिल्पाने सर्वांसमोर राजला फटकारले. दोघांनी नोव्हेंबर 2009 मध्ये लग्न केल्याची माहिती आहे. तेव्हापासून दोघेही आनंदाने जगत आहेत. बरं, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून आम्हाला कळवा...

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com