रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ येणार अडचणीत; बॉलिवूडमधील अनेक चित्रपट निर्मात्यांकडून दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल  

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

रिपब्लिक टीव्ही आणि टाइम्स नाऊ या वृत्तवाहिन्यांविरूद्ध बॉलिवूडमधील अनेक चित्रपट निर्मात्यांनी सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. चित्रपट निर्मात्यांनी या दोन्ही वाहिन्यांना चित्रपटसृष्टीबाबत बेजबाबदार आणि अपमानास्पद टिप्पणी प्रसारित करण्यापासून रोखावे, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे.

दिल्ली : रिपब्लिक टीव्ही आणि टाइम्स नाऊ या वृत्तवाहिन्यांविरूद्ध बॉलिवूडमधील अनेक चित्रपट निर्मात्यांनी सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. चित्रपट निर्मात्यांनी या दोन्ही वाहिन्यांना चित्रपटसृष्टीबाबत बेजबाबदार आणि अपमानास्पद टिप्पणी प्रसारित करण्यापासून रोखावे, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे.

बॉलिवूडच्या चार संघटना आणि न्यायालयात पोहोचलेल्या ३४ चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट उद्योगाशी संबंधित होणाऱ्या मीडिया ट्रायलवर बंदी घालण्याची मागणी केली.
न्यायालयात जाणाऱ्या बड्या निर्मात्यांमध्ये अजय देवगण, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, करण जोहर आणि रोहित शेट्टी या दिग्गजांच्या प्रॉडक्शन हाऊसची नावे आहेत

फिल्म असोसिएशनमध्ये द प्रोड्यूसर गिल्ड ऑफ इंडिया, द सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन, द फिल्म अँड टीव्ही प्रोड्युसर कौन्सिल आणि स्क्रीन राइटर्स असोसिएशनचाही समावेश आहे. रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी, रिपोर्टर प्रदीप भंडारी, टाइम्स नाऊचे मुख्य संपादक राहुल शिवशंकर, गट संपादक नविका कुमार यांनी अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बॉलिवूडविरूद्ध अपमानास्पद आणि निराधार भाष्य केले होते, असे निर्मात्यांनी म्हटले आहे. यावर बंदी घालण्याची निर्मात्यांनी मागणी केली आहे.

संबंधित बातम्या