ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुटुंबासह गोव्यात दाखल

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 22 डिसेंबर 2020

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीही आपल्या मुलीला जन्म दिल्यानंतर आता फॅमिली व्हॅकेशनसाठी गोव्यात दाखल झाली आहे. त्यांनी आपल्या खासगी जेटने गोव्याकडे कूच केले होते. याबाबत पती राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीने आपल्या फॅमिली व्हॅकेशनचे फोटो शेअर केले होते.   

पणजी- कोरोना महामारीने आपल्या आयुष्याचे नियोजनच विस्कळीत केले आहे. बाहेर पर्यटनासाठी किंवा कामानिमित्त जाण्यासाठी अनेक गोष्टींचे पालन करावे  लागते.  मात्र, असे असतानाही आता लोक काही प्रमाणात बाहेर पडताना दिसत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीही आपल्या मुलीला जन्म दिल्यानंतर आता फॅमिली व्हॅकेशनसाठी गोव्यात दाखल झाली आहे. त्यांनी आपल्या खासगी जेटने गोव्याकडे कूच केले होते. याबाबत पती राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीने आपल्या फॅमिली व्हॅकेशनचे फोटो शेअर केले होते.   

आपल्या इंस्टाग्रॅम अकाउंटवरून फॅमिली फोटो शेअर केले आहे ज्य़ात त्यांचे पूर्ण कुटुंब पोज देताना दिसत आहे.अर्थात यात सर्वात जास्त लक्ष वेधले ते शिल्पाची  लिटल गर्ल समीशाने. तिची आपल्या वडिलांकडे बघतानाची पोज बघून चाहत्यांना चांगलाच आनंद  झाला. या फोटोमध्ये शिल्पाच्या फॅमिली व्यतिरिक्त तिची बहिण शमिता शेट्टी तसेच आई सुनंदा शेट्टी दिसत आहे. याबरोबरच शिल्पाचे सासू-सासरे उषा रानी कुंद्रा आणि बाल कृष्ण कुंद्रा हे सुद्धा फोटोमध्ये दिसत आहेत.  
 
वयाच्या ४५व्या वर्षी आई झाल्यानंतर लोकांच्या रिअॅक्शनबाबत बोलताना शिल्पाने सांगितले होते की, 'मी दुसऱ्या लोकांकडे याबाबतीत लक्ष देत नाही कारण ही त्यांची जागा नाही. मी आई म्हणून आपले सर्वोत्तम देत आहे. मी माझ्या मुलांना माझ्या आईवडिलांनी आम्हाला सांभाळले तसेच सांभाळणार आहे. फरक एवढाच आहे की आम्ही छोट्याशा कुटुंबात जन्म घेतला होता. त्यामुळे आम्हाला सोयी सुविधा नव्हत्या मात्र, प्रेम तेवढेच होते.'शिल्पाने त्यावेळी आपल्या कारकिर्दितील यशाचे श्रेय आपले पती राज कुंद्रा यांना दिले होते. आपण काहीही केले तरी पतीचा त्याबद्दल आपल्याला मोठा आधार असल्याचेही ती म्हटली होती.   

 
 

संबंधित बातम्या