प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगच्या आईला A नेगेटिव्ह ब्लडची गरज

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 6 मे 2021

बॉलिवूड गायक अरिजीत सिंहच्या आईची तब्येत बिघडली आहे. त्यांना कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरिजीतच्या आईला ए नेगेटिव्ह रक्ताची आवश्यकता आहे ज्यासाठी अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

कोलकाता: बॉलिवूड गायक अरिजीत सिंहच्या(Arijit Singh) आईची तब्येत बिघडली आहे. त्यांना कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरिजीतच्या आईला ए नेगेटिव्ह रक्ताची( A negative blood) आवश्यकता आहे ज्यासाठी अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. स्वस्तिका सोबत दिग्दर्शक श्रीजित मुखर्जी देखील लोकांकडे मदतीसाठी विचारत आहेत.(Bollywood singer Arijit Singh's mother needs A negative blood)

सूर नवा ध्यास नवाचं गोव्यातील शूटिंग बंद; सेटवर कार्यकर्त्यांचा राडा

स्वस्तिकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांना मदत मागितली आहे. गायक अरिजीत सिंगच्या आईसाठी आज ए नेगेटिव्ह रक्ताची गरज आहे. त्या कोलकाताच्या एएमआरआय(AMRI)ढाकुरिया हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. त्याचबरोबर डोनर पूरूष असला पाहिजे असंही त्यांनी सांगितले आहे. त्याचवेळी दिग्दर्शक श्रीजितने बंगाली भाषेत ही पोस्ट कॉपी करुन शेअर केली आहे.

 

स्वस्तिकच्या पोस्टवर कमेंट करून अरिजीतचे चाहते माहिती मागत आहेत जेणेकरुन ते रक्तदान करू शकतील. अरिजितच्या आईच्या तब्येतीबाबत अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही. स्वस्तिक मुखर्जीशिवाय भूमी पेडणेकर, तापसी पन्नू सारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी ऑक्सिजन, हॉस्पिटल बेड, औषधे आणि इतर अनेक गोष्टींसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून लोकांना मदत करत आहेत.

संबंधित बातम्या