बॉलिवूड स्टार किड्स पुन्हा कंगनाच्या निशाण्यावर

स्टार किड्सची तुलना केली उकडलेल्या अंड्यांशी
बॉलिवूड स्टार किड्स पुन्हा कंगनाच्या निशाण्यावर
Kangana RanauatDainik Gomantak

आपल्या धाडसी वक्तव्याने बऱ्याचदा चर्चेत आलेली सिनेअभिनेत्री कंगना रणौत हीने पुन्हा एकदा बॉलिवूड स्टार किड्सवर निशाणा साधला असुन यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. बॉलिवूड स्टार किड्सची तुलना तीने उकडलेल्या अंड्यांशी केली आहे. तसेच यांच्यामूळे बाहेरुन आलेल्या कलाकारांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं असं ती म्हणताना दिसते आहे.

Kangana Ranauat
'kushi' मध्ये सामंथा रुथ प्रभूसोबत झळकणार विजय देवरकोंडा

दाक्षिणात्य चित्रपटांना बॉलिवूड चित्रपटांच्या तुलनेत जास्त यश का मिळत आहे. यावर रणौतनं भाष्य केलं आहे. ज्यांना अनेक हिंदी चित्रपटांमध्ये सहजरित्या घेतलं जातं. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीची अशी अवस्था झाली आहे. ज्याप्रकारे माझं माझ्या प्रेक्षकांशी बॉन्डिंग आहे. ते खूप खास आहे.

Kangana Ranauat
Vicky Kaushal: विकी कौशलचे उरीसह गाजवले 'हे' 4 चित्रपट

इतर वेळी काय होतं की, स्टार किड्स शिक्षण घेण्यासाठी परदेशात जातात. इंग्रजीमध्ये बोलतात. हॉलिवूड चित्रपट पाहतात आणि वेगळ्याच प्रकारे बोलतात. असं असेल तर ते प्रेक्षकांशी कसे जोडले जाणार ? ते दिसतातही खूपच विचित्र. सगळे उकडलेल्या अंड्यांसारखे दिसतात. त्यांचा संपूर्ण लूकच बदलला आहे. त्यामुळे लोक त्यांच्याशी कनेक्टच करू शकत नाहीत. मी कोणाला ट्रोल करत नाहीये पण ही सत्य परिस्थिती आहे.”

दरम्यान काही दिवसांपूर्वी कंगनानं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचं कौतुक केलं होतं. एवढंच नाही तर तिने अभिनेता महेश बाबूच्या वक्तव्यावरही भाष्य केलं होतं. ती म्हणाली, “हे जे त्याने म्हटलंय ते खरं आहे. मी याच्याशी सहमत आहे. मला माहीत आहे की त्याला बऱ्याच ऑफरही मिळत असतील. त्याच्या पिढीतील अभिनेत्यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला देशात नंबर वन बनवलं आहे. त्यामुळे असे कलाकार बॉलिवूडला परवडणारच नाही असं ही ती म्हणाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com