बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान कोरोना पॉझिटिव्ह

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 24 मार्च 2021

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानचा कोरोना रिपोर्ट सकारात्मक आला आहे. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आमिर खान ला घरी विलगिकरणात ठेवण्यात आले आहे.

मुंबई: बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानचा कोरोना रिपोर्ट सकारात्मक आला आहे. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आमिर खान ला घरी विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. आणि कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करायला सांगण्यात आले आहे. आमिर खानचे वय 56 वर्ष आहे. आमिर खानच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे.

गेल्या वर्षी आमिर खानबरोबर काम करणारऱ्या 7 कर्मचार्यांना कोरोना झाला होता.  त्यामध्ये त्याचे काही सुरक्षा कर्मचारी, ड्रायव्हर आणि गृहसेवकही होते. मिळालेल्या माहितीनुसार तीन दिवसा आधी आमिर खान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत होता असे सांगण्यात येत आहे.

अलीकडेच रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी, कार्तीक आर्यन, संजय लीला भन्साळी, वरुण धवन, नीतू सिंग यांसारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींमध्येही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. आमिर खान या दिवसात लालसिंग चड्ढाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता आणि नुकताच त्याने सोशल मीडियाला निरोपही दिला आहे.

संबंधित बातम्या