"बॉलीवूडचा भाईजान सलमान खान याने बिग बॉसच्या घरात केली साफसफाई"

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 10 जानेवारी 2021

बॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता अर्थात भाईजान सलमान खानचा बिग बॉसच्या घरात साफसफाई करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरुन प्रचंड व्हायरल होत आहे

मुंबई: छोट्या पडद्यावरील सर्वाधिक प्रसिध्द शो म्हणजे बिग बॉस.बिग बॉस या शोचे 14 वे पर्व खूप चर्चेलं जात असताना बॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता अर्थात भाईजान सलमान खानचा बिग बॉसच्या घरात साफसफाई करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरुन प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून कोणतही काम छोटं नसतं असा संदेश सलमानने दिला आहे.

शो दरम्यान स्पर्धक निक्की तांबोळी आणि राखी सांवत यांच्यात सतत वाद सुरुच असतात.पण विकेंटच्या डावात असं काही तरी झालं चक्क सलमान यानं बिग बॉसच्या घरात साफसफाई करण्यासाठी पोहचला.नुकताच कलर्स वाहिनीने त्यांच्या अधिकृत अशा इन्स्टाग्राम पेजवरुन प्रोमो सोशल मिडीयावर शेअर केला.या भागामध्ये सलमान खान हा निक्की तांबोळीला राखी सांवतच्या बेडरुमची साफसफाई का केली नाही असं विचारताना दिसतो आहे.त्यावर राखीच्या बेडरुमची साफसफाई करायची नाही असं सांगत आहे.सलमानच्या  साफसफाईचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सलमानवर नेटकऱ्यांनी खूप कौतुक केल.

संबंधित बातम्या