Brahmastra Box Office Collection: रणबीर-आलियाच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही केली कोटींची कमाई

Brahmastra Box Office Collection: रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा चित्रपट 'ब्रह्मास्त्र'ने दुसऱ्या दिवशीही चांगली कमाई केली आहे.
Brahmastra Box Office Collection
Brahmastra Box Office CollectionDainik Gomantak

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाची जादू जगभरात गेली आहे. शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये रिलीज झालेल्या ब्रह्मास्त्रने पहिल्याच दिवशी धमाकेदार कमाई केली आहे. ब्रह्मास्त्रने पहिल्याच दिवशी अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. कोरोनानंतर ओपनिंग डेवर हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. दुसऱ्या दिवशीही ब्रह्मास्त्राचा व्यवसाय चांगलाच वाढला आहे. या चित्रपटाचे दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे, हे पाहिल्यानंतर हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यास जास्त वेळ लागणार नाही असे म्हणता येईल. वीकेंडलाच ब्रह्मास्त्र 100 कोटींचा टप्पा पार करेल.

ब्रह्मास्त्रमध्ये (Brahmastra) रणबीर-आलियासोबत अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन मुख्य भूमिका साकारताना दिसले आहेत. याशिवाय चित्रपटात दोन खास कॅमिओ आहेत. हे कॅमिओ इतर कोणी नसून शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचे (Deepika Padukone) आहेत. दीपिका या चित्रपटात (Movie) रणबीरच्या आईच्या भूमिकेत दिसली आहे. शाहरुख आणि दीपिकाचे कॅमिओ फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलेच व्हायरल होत आहेत. एका चित्रपटात एवढ्या मोठ्या स्टार्सचा लाभ ब्रह्मास्त्रला मिळत आहे. चित्रपटाच्या दुस-या दिवशीचे कलेक्शनही धमाकेदार आहे.

Brahmastra Box Office Collection
Rakhi Sawant Boyfriend Adil : राखीच्या बॉयफ्रेंडला पाहून यूजर्स म्हणाले, 'राखी ने आदिल को भी अपने जैसा बना डाला'

दुसऱ्या दिवशी केला इतका बिझनेस
रणबीर-आलियाच्या ब्रह्मास्त्रने पहिल्या दिवशी 37 कोटींचा बिझनेस केला. आता दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन खूप वाढले आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, ब्रह्मास्त्रने दुसऱ्या दिवशी जवळपास 42 कोटींचा व्यवसाय केला आहे. ज्यामध्ये 37 कोटी हिंदी भाषेतील आणि 5 कोटी इतर भाषांतील आहेत. त्यानंतर चित्रपटाचे एकूण कलेक्शन 79 कोटींच्या आसपास होईल.

75 कोटींचा व्यवसाय केला
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाला खूप पसंती दिली जात आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात 75 कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. काही लोक चित्रपटाला खूप चांगले सांगत आहेत तर काहीजण खूप वाईट सांगत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com