भाईजानची ईदला चाहत्यांना भेट; ‘राधे’ होणार प्रदर्शित 

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 13 मार्च 2021

'राधे' सिनेमाच्या पोस्टरला चाहत्यांकडून मोठी पंसती मिळत आहे.

मुबंई: बॉलिवूडच्या भाईजानचा बहुप्रतिक्षीत ‘राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. येत्या ईदच्या मुहुर्तावर मे महिन्याच्या 14 तारखेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता सलमान खानने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम आकाऊंटवरुन राधे सिनेमाचे पोस्टर शेअर केलं आहे. सध्या हे पोस्टर सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. तर सलामानच्या चाहत्यांची उत्सुकता अजून ताणली गेलीय. राधे सिनेमाच्या पोस्टरला चाहत्यांकडून मोठी पंसती मिळत आहे.

सलमानचा 'राधे' सिनेमाच्या पोस्टरमधून दबंग अदांज पहायला मिळत आहे. सलमानने हे पोस्टर शेअर करत त्यासाठी एक कॅप्शन लिहलं आहे. ईदची कमिटमेन्ट दिली होती. ''ईदलाच येणार क्यू की एक बार जो मैने.''... असं हटके कॅप्शन दिलं आहे. चाहत्यांना दिलेले वचन पाळलं असल्याचं सांगितले आहे.

Adipurush: दिपिका पादुकोणच्या एक्झीटमुळे क्रिती सेननची प्रभाससोबत एंट्री

सलमानच्य़ा सिनेमाची चाहत्यांना कायमच उत्सुकता असते. या सिनेमामध्ये प्रसिध्द अभिनेत्री दिशा पटानी झळकणार आहे. त्यासोबतच रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. प्रभू देवाने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. आगामी काळात सलमानचे 'टाइगर 3' 'किक 2' आणि 'कभी ईद कभी दीवाली' सिनेमे येणार आहेत. तर किंग खानच्या 'पठाण' सिनेमात पाहुण्या कलाकारच्या भूमिकेत दिसणार आहे.   

 

 

संबंधित बातम्या