Case File Against Nawazuddin : नवाजु्द्दीन पुन्हा मारणार कोर्टाच्या फेऱ्या, या प्रकरणात लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप...

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि कोर्ट - कचेरी हे समीकरण पुन्हा एकदा समोर आलं आहे.
Case File Against Nawazuddin
Case File Against NawazuddinDainik Gomantak

आपल्या कुटूंबाशी सुरू असलेला वाद मिटवून आता शांतपणे कामावर लक्ष केंद्रित करण्याच्या विचारात असलेल्या नवाजला आता पुन्हा कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीविरोधात एका वकिलाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

 एका जाहिरातीद्वारे नवाजने बंगाली लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वकिलाने इंटरनॅशनल बेव्हरेजेस कंपनीलाही या प्रकरणात पक्षकार केले आहे. बंगाली समाजाबाबत केलेला विनोद अत्यंत अश्लील असून त्यामुळे बंगाली जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

या प्रकरणात वकिलाच्या वतीने कोलकाता उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे की, हिंदीमध्ये केलेल्या जाहिरातीमुळे त्यांना कोणतीही अडचण नाही, परंतु ज्या पद्धतीने ती बंगालीमध्ये डब करण्यात आली आहे आणि अनेक टीव्ही चॅनल्सवर प्रसारित केली जात आहे, त्यामुळे बंगाली समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या जातात.

व्हिडिओमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी बंगालीमध्ये केलेल्या विनोदावर हसताना दिसत आहे. या संवादावरून वाद निर्माण झाला आहे. यावर तक्रारदाराने आक्षेप नोंदवून भावना दुखावल्याचे म्हटले आहे. ही जाहीरात बंगाली लोकांच्या भावनांचा अपमान करणारी आहे असा थेट आरोप नवाजुद्दीनवर करण्यात आला.

Case File Against Nawazuddin
Mann Ki Baat: ‘पोषण मास’ उपक्रमात सहभागी होण्यासाठी PM मोंदींचे नागरिकांना आवाहन

व्हिडिओमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी बंगालीमध्ये म्हटलेल्या विनोदावर हसताना दिसत आहे. या संवादावरून वाद निर्माण झाला आहे. यावर तक्रारदाराने आक्षेप नोंदवून भावना दुखावल्याचे म्हटले आहे.

वकिलाने सांगितले की त्यांना हिंदी जाहिरातीबद्दल कोणतीही अडचण नाही कारण त्यात अपमानास्पद काहीही नाही, परंतु बंगाली आवृत्ती IT कायद्याच्या कलम 66A चे उल्लंघन करते. त्यावर कलम १५३ आयपीसीही लागू आहे. भविष्यात अशा जाहिराती करू नयेत, असेही ते म्हणाले.

पोलिस तक्रार आणि वादानंतर ही जाहिरात आता टीव्ही आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात येणार आहे. कोल्ड्रिंक कंपनीनेही फक्त बंगाली भाषेत ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिले, 'आम्ही आमच्या अलीकडील बंगाली जाहिरात मोहिमेमुळे भावना दुखावल्याबद्दल दिलगीर आहोत. आमची कंपनी बंगाली भाषेचा आदर करते.

याआधीही अनेकदा जाहिरातींवर आक्षेप घेण्यात आला असून, प्रकरण तापल्यानंतर ते काढूनही टाकण्यात आले आहेत. विशेष म्हणजे अनेक वेळा प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशा प्रचारही केल्या जातात

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com