'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेचे कलाकार घेतायेत गोवा ट्रिपचा आनंद; या तारखेला घेणार मालिका निरोप

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मार्च 2021

झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको'  प्रेक्षकांच्या खुप आवडीची आहे. या मालिकेने जवळपास पाच वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तेव्हा आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको'  प्रेक्षकांच्या खुप आवडीची आहे. या मालिकेने जवळपास पाच वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तेव्हा आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या शेवटच्या टप्प्याचं शुटींग सुरु असताना मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांनी एकमेकांसोबत वेळ घालवण्याचं औचित्य साधून ट्रिपचं आयोजन केलं आहे. अभिनेत्री अनिता दाते केळकर, अभिजीत खांडकेकर, अदिती द्रविड, अद्वैत दादरकर आणि मालिकेतील इतर सहकलाकार गोव्याला फिरायला गेले आहेत. या गोवा ट्रिपचे फोटो या कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 2016 मध्ये झी मराठी या वाहिनीवर ही मालिका सुरु झाली होती. पाच वर्षापासून यातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. शनाया, गुरुनाथ सुभेदार आणि राधिका या पात्रांवरून अनेक मीम्ससुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आणि त्यातून अनेकांचे मनोरंजनही झाले आहे. 

या मालिकेचा शेवटचा एपिसोड ७ मार्च रोजी प्रसारित करण्यात येणार आहे. टीआरपीच्या यादीत या मालिकेने बऱाच काळ अग्रस्थान मिळविले होती. या मालिकेतील शनायाची भूमिका चांगलीच गाजली आणि प्रेक्षकांनी फारच डोक्यावर घेतली होती. मालिकेत सुरुवातीला अभिनेत्री रसिका सुनीलने शनायाची ही भूमिका साकारली होती. तिच्यानंतर इशा केसकरची मालिकेत शनाया म्हणून एंट्री झाली. काही काळानंतर पुन्हा एकदा रसिकाने मालिकेत पुनरागमन केले. मालिकेतील शनयाची भूमिका बदलल्यानंतरही नेटकऱ्यांमध्ये शनायाची क्रेझ कायम होती आणि आहे.

तापसी पन्नूच्या अडचणीत वाढ; 5 कोटींच्या रोखीची पावती जप्त 

मालिकेच्या कथानकात काही खास वळणं आणि इंटरेस्टींग ट्विस्ट घडत नसल्याने मालिकेच्या टीआरपीमध्ये घसरण होत गेली. अखेर आता मालिकेच्या निर्मात्यांनी माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यातील कलाकार सोशल मीडियाद्वारे अजूनही चाहत्यांच्या संपर्कात आहेत आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. माझ्या नवऱ्याची बायको सेटवरील अनेक फोटो, व्हिडीओ मौज, मस्ती हे कलाकार चाहत्यांसोबत शेअर करत असतात. 

करण जोहरने करून दिली धर्मा प्रॉडक्शनच्या 14 नव्या दिग्दर्शकांची ओळख 

 

संबंधित बातम्या