सोशल मीडियावर सेलिब्रिटींनी साजरा केला गुढी पाडवा: पहा फोटो

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 13 एप्रिल 2021

बिग बॉस 14 चा पहिला धावपटू राहुल वैद्य आणि दिशा परमारच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. बिग बॉस 14 मध्ये राहुलने दिशाला लग्नासाठी प्रपोज केले होते. आणि दिशाने त्याला होकार दिला आहे.

बिग बॉस 14 चा पहिला धावपटू राहुल वैद्य आणि दिशा परमारच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. बिग बॉस 14 मध्ये राहुलने दिशाला लग्नासाठी प्रपोज केले होते. आणि दिशाने त्याला होकार दिला आहे. यानंतर चाहते त्यांच्या लग्नाच्या तारखेची प्रतीक्षा करीत आहेत. राहुलचे पालक आधीच दिशाला आपली सून मानत आहेत आणि प्रत्येक उत्सवात ती त्याच्यात सामील होतांनाद दिसत आहे. दिशाने यंदा राहुलबरोबर गुढी पाडव्याचा सण साजरा केला आहे. ज्याची फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

काजोल सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव असते तीचे प्रचंड फॅन फॉलोइंगची आहेत. आज गुढीपाढव्याच्या पर्वावर कोजोलने तान्हाजी चित्रपटात सावित्रिबीऊचू भुमिकी साकारली होती. त्याच चित्रपटातील सावित्रीबाईच्या भुमिकेतील एक फोटो शेअर करत तीने आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

गुढीपाडवा सेलिब्रेशनसाठी कंगना रनौतने साडी घालून पारंपारीक मराठी वेषभूषा केली. या लूकमध्ये ती खुप सुंदर दिसत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कंगनाने साडी घालून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या पारंपारीक लूकने तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

त्याचबरोबर मराठी कलाकारंनीसुध्दा फोटो शेअर करत मराठी नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

Searching For Sheela: ओशोंच्या वादग्रस्त पीएच्या जीवनावर डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर रिलीज 

अभिनेता पुष्कर जोगसाठी यंदाचा गुढी पाडवा खुपच खास आहे कारण अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर त्याचा ‘वेल डन बेबी’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. पुष्करने या चित्रपटात अभिनेता म्हणून काम केलच पण त्याचबरोबर त्याने या चित्रपटाची सहनिर्मिती देखील केली आहे. प्रेक्षकांकडून त्याला चांगल्या प्रतिक्रिया मिळत त्यामुळे तो जाम खुश आहे आज गुढी पाडव्याच्या प्रसंगी आपल्या कुटुंबासोबत शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पुष्कर आणि चित्रपटाची मुख्य कलाकार अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते दिसत आहे. या तिघांनी मिळून प्रेक्षकांना सुरक्षा, आनंद आणि समृद्धीने भरलेल्या मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

मराठी क्युट कपल अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांनी सुद्धा फोटो शेअर करत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गेट रेडी म्हणत आपल्या प्रेक्षकांना मराठी नववरर्षाच्या सुरवातीसाठी सजोज केल आहे. या फोटोमध्ये उमेशने पोपटी रंगाचा कुर्ता घातला असून प्रियाने जांभळ्या रंगाची साडी घातली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

संबंधित बातम्या