बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी करण जोहरला एनसीबीकडून समन्स

गोमने्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

प्रसिद्ध दिग्दर्शक- निर्माता करण जोहरला केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) नोटीस पाठवली आहे. त्याने २०१९ मध्ये आयोजित केलेल्या पार्टीबाबत व्हायरल झालेल्या व्हिडीओप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई :  प्रसिद्ध दिग्दर्शक- निर्माता करण जोहरला केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) नोटीस पाठवली आहे. त्याने २०१९ मध्ये आयोजित केलेल्या पार्टीबाबत व्हायरल झालेल्या व्हिडीओप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला असून बुधवारी ही नोटीस पाठवण्यात आल्याचे सांगितले.

सप्टेंबरमध्ये शिरोमणी अकाली दलचे नेते मनजिंदरसिंग सिरसा यांनी एका व्हिडीओद्वारे समोर आलेल्या पार्टीमुळे करण जोहर, दीपिका पादुकोण, मलाइका अरोरा, अर्जुन कपूर, शाहिद कपूर, विक्की कौशल, वरुण धवन यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. मनजिंदरसिंग सिरसा यांनी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) चे प्रमुख राकेश अस्थाना यांची भेट घेऊन करण जोहर आणि इतरांवर ड्रग्ज पार्टीचे आयोजन केल्याबद्दल चौकशी करण्याची मागणी केली होती. दरम्यान, अभिनेता अर्जुन रामपालला एनसीबीने समन्स बजावले आहे.

संबंधित बातम्या