गोव्यातील 'चेडवा' एक आकर्षक म्युझिक व्हिडिओ

अमोद हा आजच्या घडीचा गोव्याचा (Goa) यशस्वी युट्युबर असून त्याच्या या चॅनलचे सुमारे 27 हजार सबस्क्रायबर आहेत.
गोव्यातील 'चेडवा'  एक आकर्षक म्युझिक व्हिडिओ
Chedwa' from Goa is an attractive music videoDainik Gomantak

अमोद हा खरंतर एकेकाळचा बॉडीबिल्डिंग क्षेत्रातला, राज्यपातळीवर गाजणारा बॉडीबिल्डर. शरीरसौष्ठव स्पर्धेत त्याने अनेक पारितोषिकेही जिंकली आहेत. त्याच्या त्या किर्तीमुळेच त्याला सिनेमात (Movie) काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ‘अभिनय’ हेच त्याच्या आवडीचे क्षेत्र बनले. तो स्वतःही ‘फेक’ या कोकणी सिनेमाचा निर्माता आहे. त्याच्या सिनेमातली गाणी स्वतंत्रपणे युट्युबवरून (YouTube) इतकी लोकप्रिय झाली की त्याने त्यानंतर म्युझिक व्हिडिओकडेच (Music Video) आपले लक्ष अधिक केंद्रित केले. आपले ‘अमोद म्हार्दोळकर प्रॉडक्शन्स’ हे यूट्यूब चॅनल निर्माण करून त्याने त्यावरून आतापर्यंत आठ म्युझिक व्हिडिओ प्रसारित केले आहेत. वैशिष्ट्यपूर्ण अशा गाण्यांमुळे आणि त्यातील आकर्षक अशा दृश्यांमुळे त्याचा हा यूट्यूब चॅनल लोकप्रियही झाला. अमोद हा आजच्या घडीचा गोव्याचा (Goa) यशस्वी युट्युबर आहे. त्याच्या या चॅनलचे सुमारे 27 हजार सबस्क्रायबर आहेत. ‘चेडवा’, हे एका महिन्यापूर्वीच त्या चॅनलवरून प्रकाशित झालेले गाणे, आतापर्यंत जगभरात 11 लाख लोकांनी पाहिले आहे.

अमोदच्या म्युझिक व्हिडीओचे वैशिष्ट्य म्हणजे, तो त्यातून युवा मनाला साद घालतो. ‘प्रेम’, ‘प्रणय’, या युवकांना प्रभावित करणाऱ्या भाव-भावनांना अतिशय सोप्या शब्दांमधून तो मांडतो आणि त्यानंतर देखणेपणाने दृश्य माध्यमातून सादरही करतो. त्याच्या या नवीन ‘चेडवा’ या व्हिडिओतही (Video) ‘स्वप्न आणि भास’ हे माध्यम वापरून तो ‘प्रणय’ ह्या नित्य टवटवीत असलेल्या मानवी अंतःप्रेरणाना खुमासदारपणे खुणावतो. या व्हिडिओचा भाग असलेले सारे अभिनेते कलाकार हे तरुण आणि उत्फुल्ल व्यक्तिमत्त्वाचे असल्याने त्याच्या या म्युझिक व्हिडिओचे निर्मितीमूल्यही खचितच वाढते.

आपले सारे कलाकार अमोद ऑनलाइन (Online) असलेल्या सोशल मीडियावरून निवडतो. कलाकार निवडल्यानंतर त्यांचे ‘ऑडिशन’ घेतले जाते. कलाकारांची अभिनय क्षमता पाहून त्यांची अंतिम निवड मग व्हिडिओसाठी केली जाते. अर्थात म्यूझिक व्हिडिओचे इतर तपशील ठरवण्यासाठी प्रोडक्शन टीमच्या सदस्यांच्या कैक मीटिंग होतात. ज्यात लोकेशन. वेशभूषा, वाहतूक इत्यादी निर्मितीसंबंधातल्या बाबी ठरवल्या जातात.

‘चेडवा. या व्हिडिओमधले गाणे स्वतः अमोदनेच लिहिले आहे. त्याच्या बहुतेक म्यूझिक व्हिडिओमधल्या गाण्याची शब्दरचना त्याचीच असते. एकदा गाणे लिहून झाल्यानंतर निर्माता आणि व्हिडिओचे दिग्दर्शक मिळून व्हिडीओची मांडणी ठरवतात आणि त्यानंतर कशाप्रकारचे संगीत या गाण्याला हवे ते ठरवले जाते. गाणे संगीतबद्ध होऊन आल्यानंतर शूटिंगला सुरुवात होते. व्हिडिओ तयार झाल्यानंतर ‘मीडिया प्रमोटर’ व्हिडिओच्या प्रसिद्धीसाठी वेगवेगळे मार्ग आखतो आणि त्याप्रमाणे व्हिडिओच्या पुर्वप्रसिद्धीस सुरुवात होते आणि हे सारे अत्यंत व्यावसायिक पद्धतीने पार पडल्यानंतर व्हिडिओ यूट्यूबवर प्रकाशित केला जातो.

Chedwa' from Goa is an attractive music video
HBD Hrithik: 'लाखो दिलो की धडकन' हृतिकचे, जाणून घ्या रंजक किस्से

अमोद म्हणतो, थिएटर किंवा तत्सम जागांवर आपले व्हिडीओ रिलीज करण्यापेक्षा युट्यूब किंवा समाज माध्यमांवरून रिलीज करणे हे अधिक सोपे आणि विना कटकटीचे आहे. युट्युबवरून जगभरातले दर्शक तुमची निर्मिती विनाविलंब पाहू शकतात. मोकळेपणी त्यांच्या प्रतिक्रियाही देऊ शकतात. प्रत्येक शंभर दर्शकांमागे त्यांना यूट्यूबद्वारे 1.00 डालर परतावा मिळतो.

युट्युब हेच माध्यम

आज लहान-सहान निर्मितीसंस्थांसाठी युट्युब हे भक्कम पाठबळ असलेले माध्यम बनले आहे. युट्युब नसते तर ‘चेडवा’सारख्या निर्मितीला अकरा लाख दर्शक कुठून मिळाले असते? या अकरा लाख दर्शकांमुळेच अमोदला, तो एक कलाकार असल्याचे समाधान अमापपणे लाभते. त्याच्या व्हिडीओला लाभणाऱ्या दर्शकांचे कमेंट्स वाचल्यावर बहुसंख्यांना त्याचे व्हिडिओ आवडल्याचेही लक्षात येते. आज गोव्यात (Goa) अमोद एक लोकप्रिय व्यक्तिमत्व बनून आहे ते त्याला समाज माध्यमावर मिळालेल्या प्रतिसादामुळेच. युट्युबवर ‘चेडवा’ किंवा अमोद म्हार्दोळकर प्रॉडक्शन्स’ टाईप केल्यास अमोदचा हा आकर्षक म्युझिक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल. तो तुम्हाला त्यातल्या साध्या परंतु आकर्षक मांडणीमुळे आनंदही देईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com