अभिनेता सोनू सूद च्या प्रश्नाला चीनने दिलं उत्तर

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 3 मे 2021

सोनू सूद चांगलाच भडकला.

देशात कोरोनाचा प्रादूर्भाव (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. लॉकडाऊन काळामध्ये आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या लोकांसाठी अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) मदतीचा हात पुढे केला आहे. सोनूने कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ते आत्तापर्यंत गरजूंना मदत केली आहे. परंतु आता देशातील परिस्थिती गंभीर बनली असता ऑक्सिजन अभावी अनेक कोरोना रुग्णांना जीव गमावावा लागला आहे. यावर सोनू सूद चांगलाच भडकला आणि त्याने थेट चीनलाच प्रश्न विचारला आहे. त्याने केलेल्या प्रश्नावर चीनने उत्तर दिलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता सोनू सूद लोकांना मदत करण्यासाठी सोशल मिडियावर चांगलाच सक्रिय असतो. एक नेटकऱ्याने त्याला सोशल मिडियावर टॅग करत शेकडो ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स हे चीनवरुन भारतात आणले जात आहेत. परंतु चीनकडून मुद्दाम अडथळा आणला जात असल्याचं सांगितलं आहे. यावर संतापून  सोनूने सोशल मिडियावरील ट्विटरवरुन  चीनला थेट प्रश्न केलाय. या ट्विटमध्ये सोनूने लिहलंय, ‘’देशात चीनमधून शेकडो ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तिथे तुम्ही आमचे कितीतरी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स अडवले आहेत आणि इकडे मात्र ऑक्सिजनच्या अभावी अनेक कोरोना रुग्णांचे मृत्यू होत आहेत. आमचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणण्यासाठी आम्हाला मदत करा जेणेकरुन लोकांचे जीव वाचतील...’’ या ट्विटमध्ये सोनूने चीनचे राजदूत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाला टॅग केलं आहे.

Coronavirus: हृतिक रोशन सह हॉलिवूड कलाकारांची भारताला मोठी मदत

अभिनेता सोनू सोदूने केलेल्या प्रश्नावर चीनचे राजदूत सुन वेइदांग यांनी उत्तर दिलंय, ‘’सूद तुमच्या ट्विटनंतर आम्हाला ही माहिती मिळाली आहे. कोरोना लढ्यामध्ये भारताला चीन सर्वोतपरी मदत करेल, माझ्या माहीतीनुसार चीनमधून भारतासाठी जाणाऱ्या सगळ्या कार्गो प्लाईट्स सुरळीत सुरु आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून चीनमधून भारतासाठीच्या कार्गो प्लाईट्स उत्तम काम करत आहेत.’’

चीनकडून आलेल्या उत्तराला रिप्लाय देत सोनू सूदने ट्विट करत म्हटले, ‘’तुमच्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद! ही अडचण दूर करण्यासाठी मी तुमच्या कार्यालयासाठी संपर्कात आहे, तुम्ही केलेल्या सहकार्यबद्दल खूप आभार’’

संबंधित बातम्या