कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, नव्या जोमाने पून्हा परतणार

दैनिक गोमन्तक
शनिवार, 19 डिसेंबर 2020

नृत्यदिग्दर्शक रोमो डिसूझा यांना मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. ११ डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

नवी दिल्ली: नृत्यदिग्दर्शक रोमो डिसूझा यांना मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. ११ डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

46 वर्षीय नृत्यदिग्दर्शक रेमोचे शुक्रवारी त्यांच्या राहत्या घरी जोरदार स्वागत करण्यात आले, घरी आल्याचा एक व्हिडिओ त्याने आपल्या सोशल मीडिया प्रोफाइलवर शेअर केला आहे. रेमो डिसूझाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "मी परत आलो आहे", ज्यात त्याने आपल्या चाहत्यांचे आणि मित्रांचे "प्रेम, प्रार्थना आणि आशीर्वाद" याबद्दल आभार मानले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Remo Dsouza (@remodsouza)

रेमोच्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, त्याचे मित्र आणि मनोरंजन क्षेत्रातील सहकाऱ्यांनी कमेंट मध्ये प्रेम आणि शुभेच्छा पाठवल्या आहे.  नृत्यदिग्दर्शक टेरेंस लुईस यांनी लिहिले की,"माझा दिवस बनला! आपल्या प्रियजनांसोबत तुला घरी सुरक्षित पाहून आम्हाला आनंद झाला! आनंदी रहा, मी परत येताच तुला भेटायला येणार आहे!"  तर गीता कपूर यांनी लिहिले की, "तू खूप आनंदी आहेस ... घरीच राहा, निरोगी रहा, सदैव आनंदी रहा. लिव्ह लाइफ रेमो”  आणि फिल्म अभिनेता टायगर श्रॉफने कमेंट केली की, "पूर्वीपेक्षा आणखी जोमाने परत येण्याची वेळ आली आहे."

 

संबंधित बातम्या