कॉमेडियन Bharti Singhने घटवले 15 किलो वजन

संध्याकाळी 7 ते 12 दरम्यान काही खात नाही नसल्याचा Bharti Singhचा दावा
कॉमेडियन Bharti Singhने घटवले 15 किलो वजन
Comedian Bharti SinghDainik Gomantak

कॉमेडियन भारती सिंह (Comedian Bharti Singh) यांनी शक्य होईल तसे उपवास करून आतापर्यंत 15 किलो वजन कमी केले, तिने सांगितले की तिचे वजन कमी झाल्यामुळे आणि मेहनतीमुळे तिला दमा आणि मधुमेहामध्येही आवाक्यात ठेवण्यात मदत झाली. भारती सिंगने 15 किलो वजन घटवल्याबद्दल (Bharti lost 15 Kg Weight) आणि तिचे पती हर्ष लिंबाचिया (Anchor Harsh Limbachia) यांच्या नवीन लुक्सबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. वजन घटवल्याची गोष्ट भारतीने एका मुलाखतीत उघड केले.

Comedian Bharti Singh
Video: 'बचपन का प्यार' गाणारा सहदेव पुन्हा चर्चेत; नवं गाणं ऐकाच

भारती म्हणाली की वजन कमी केल्याने मधुमेह आणि दमा या आधीपासून असलेल्या आजारांबद्दल वैद्यकीय परिणामांवर देखील मदत झाली. पुर्वी जास्त वजनामुळे दमायला व्हायचे, पण आता वजन कमी केल्यामुळे फारसा दम लागत नसल्याचे तिने सांगितले. भारतीने आपले वजन 91 किलो वरून 76 किलोवर आणले आहे. भारतीने मुलाखतीमध्ये आपल्या नेहमीच्या विनोदी शैलीमध्ये म्हणाली, "मी संध्याकाळी 7 ते 12 च्या दरम्यान खात नाही. पण मी रात्री 12 नंतर अन्नावर हल्ला करते.

तिने कबूल केले की वजन कमी करण्याच्या बाबतीत तिने शिखर गाठले असून, तिला स्वतःचा अभिमान असल्याचे बोलली. आणि "जेव्हा स्वतःला पडद्यावर पाहते तेव्हा खूप चांगले वाटते." असे आनंदाने बोलली. भारती सध्या 'द कपिल शर्मा शो' आणि 'डान्स दिवाने 3' मध्ये दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com