Sajid Khan: साजिद खानच्या अडचणीत वाढ; अभिनेत्री शर्लिन चोप्राकडून लैंगिक छळाची तक्रार

शनिवारी रात्री जुहू पोलीस ठाण्यात शर्लिननं तक्रार दाखल केली.
Sajid Khan
Sajid Khan Dainik Gomantak

बिग बॉसमध्ये (Bigg Boss) गेल्यापासून टीकेचा धनी झालेल्या साजिद खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रानं (Sherlyn Chopra) साजिद खान (Sajid Khan) विरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे. शनिवारी रात्री जुहू पोलीस ठाण्यात (Juhu Police Station) शर्लिननं तक्रार दाखल केली. साजिद खान 2018 सालापासून वादात सापडला आहे.

तक्रार दाखले केल्यानंतर शर्लिननं माध्यमांशी संवाद साधला. 'महिला पोलीस अधिकाऱ्यांनी माझं म्हणंण नोंदवले आहे.साजिद खानला लवकरात लवकर बिग बॉसच्या घरातून बोलवून त्याचा जबाब नोंदवणार आहेत. असं पोलिसांनी आश्वासन दिल आहे. जुहू पोलिसांनी (Juhu Police) या प्रकरणात लक्ष घालून आरोपीला शिक्षा करावी. मग आरोपी कोणीही असो, तो फराह खानचा भाऊ असो किंवा सलमान खानचा लाडका असो.' असे शर्लिन चोप्रा म्हणाली.

Sajid Khan
Ananya Panday Birthday: अनन्या पांडेचा नेट वर्थ पाहून तुम्ही व्हाल थक्क!

सलमान खान (Salman Khan) यांना मी भाईजान बोलते, म्हणजे मी त्यांच्या बहिणी सारखीच आहे. त्यांनी माझी मदत करावी. मी सलमान खान यांच्या घराबाहेर शंतीपूर्वक आंदोलन करणार असल्याचंही शर्लिन चोप्रानं यावेळी सांगितलं. दरम्यान, अनेक अभिनेत्रींनी साजिद खानवर लैंगिक छळाचे आरोप केले होते. अलीकडेच राणी चॅटर्जीनेही साजिदवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे साजिदला वर्षभर इंडस्ट्रीत काम न करण्याचे आदेश देण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com